रामापुर परिसरात सोयाबीन सोंगणीला सुरुवात...शेतकरी हवालदिल,उत्पन्न एकरी 2 ते 3 क्विंटल...
सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
रामापुर,बोर्डी,शिवपूर,सह परिसरात सद्या सोयाबीन सोंगणीचे काम सुरू झाले आहे.एकरी 2500 ते 2600 रुपये एकर प्रमाणे मजूराने सोयाबीन सोंगणीला सुरुवात झाली आहे.मात्र यावर्षी झालेल्या मुसळधार पाऊस व,सततच्या पावसाने बुरशी जन्य रोगाचे प्रमाण वाढल्याने,व सोयाबीन यलो मोजॅक,रोग आल्याने सोयाबीनच्या शेंगा भरण्याआधीच सोयाबीनचे झाडे सुकल्याने सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान होऊन सोयाबीन पिकात प्रचंड घट झाली आहे.सततच्या पावसाने काही सोयाबीनची नुसतं वाढ झाली असून अक्षरशः सोयाबीनच्या झाडाला एकही शेंग न लागल्याने काही प्रमाणात सोयाबीन ट्रॅक्टरने मोडण्यात आले आहे.व राहिलेले सोयाबीन सोंगणी सुरू असून उत्पन्न एकरी 2 ते 3 क्विंटल होत असल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे.शेत तयार करणे,बी,खत,पेरणी खर्च,फवारे,सोंगणे,तयार करणे,मजुरीखर्च पाहता जवळजवळ एकरी 20 ते 25 हजार रुपये खर्च सोयाबीन पिकाचा झाला असतांना उत्पन्न मात्र 15 हजार रुपये शेतकऱ्यांच्या हाती येत असल्याने लावलेले पैसे सुद्धा निघत नसल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचा अंत न पाहता त्वरित सरसकट मदत घोषित करावी अशी मागणी बोर्डी,रामापुर,शिवपूर,सह परिसरातील शेतकरी करीत आहे.
