सुनिल मोंढे यांचा निरोप समारंभ गावक-याच्या उपस्थित संपन्न...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
चिखलदरा तालुक्यातील टेब्रुंसोडा या गावात ग्रामपंचायत येथे ग्राम विकास अधिकारी म्हणून तिवसा तालुक्यातील सुनिल मोंढे साहेब हे गेल्या सहा वर्षांपासून ग्रामपंचायत टेब्रुंसोंडा येथे कार्यरत होते.त्यांच्या कार्यकाळात टेब्रुंसोंडा या गावात पाणी टंचाई, हागदरी मुक्त गाव, घर टँक्स वसुली, गावातील नागरीकाचे कामे, गावातील विकासासाठी तळमळ हे सातत्याने मोंढे साहेबांच्या कार्यकाळात झाले आहे. तसेच ग्रामपंचायत मधिल सरपंच, उपसरपंच, तसेच सदस्य गन यांच्या सर्वाधिक मिळुन मोंढे यांनी चांगल्या प्रकारे गावातील विकासा बाबतीत चागले कामे केले आहे.
परंतु मोंढे साहेब यांची बदली तिवसा पंचायत समिती येथे झाल्या मुळे टेब्रुंसोंडा गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य गन व गावकरी यांना खुप दु:ख झाले असल्याचे पाहण्यासाठी मिळाले आहे. मोंढे साहेब यांना ग्रामपंचायत टेब्रुंसोंडा येथे कार्यमुक्त करण्याच्या दिवसी सरपंच शैलेश गावंडे तसेच त्याची बावडी व सुरेश खडके यांनी निरोप संमारभ ठेवले या संमारभात मोंढे साहेब यांना शालसिरफळ देवून यांचे आभार मानल्या गेले आहे. या निरोप संमारभाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी टेब्रुंसोडा येथिल शिक्षक, शिक्षिका, अगनवाडी सेविका, आरोग्य विभाग व गावातील मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.

