ओम साई फाऊंडेशनलाच वसुबारसचा पहिला मान...ऐन दिवाळीत दिले वासराला जीवदान...


 
ओम साई फाऊंडेशनलाच वसुबारसचा पहिला मान...ऐन दिवाळीत दिले वासराला जीवदान...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

झालं असं की सिनेमा रोड नांदुरा वर मयूर शु पॅलेस च्या बाजूला एक ओसाड खूप जुनी विहीर आहे. या विहिरीत एक वासरू पडल्याची बातमी पसरली.दिवस ऐन दिवाळीचे. त्यात विहीर म्हणजे त्या जुन्या आडाचा व्यास केवळ 4-5 फूट. आणि खोली तब्बल 100 फूट. खाली बघितलं तर अंधाराशिवाय काहीच दिसणार नाही.पण खालून जिवाच्या आकांताने हंबरण्याच्या आवाज कुणीतरी ऐकला आणि त्या मुक्या जीवाची वार्ता सगळीकडे पसरली. आत वासरू पडलंय हे खरं पण काढायला आत उतरावं लागणार... शिवाय त्या भयाण ओसाड विहिरीत विंचू, साप, पाली आणि अन्य कीटक यांचं भय. एकट्यालाच आत जावं लागणार...

असले असंख्य प्रश्न... आणि फक्त प्रश्नच...

दिवाळीत वसुबारस ला फिरत्या गाय वासरांना घास भरवून स्वतःची जबाबदारी संपवणं सोपं असतं आपल्यासाठी. पण ऐन दिवाळीत त्या वासराला जीवदान कसं द्यायचं हा प्रश्न आल्यावर कुणालातरी पोलिसांची आठवण झाली...कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील सर व श्री घोपे साहेब यांनी तक्रार ऐकून घेतली.पण विहिरीत पडलेली जनावरं काढणं हे काही पोलिसांचं काम नव्हे असलं सरकारी उत्तर त्यांनी दिलं नाही. मुका असला तरी तो जीव होता. सगळ्या शहरात दिवाळीचा आनंद असताना आपल्या डोळ्यादेखत एक गोवंश तडफडून मरणे त्यांनाही अस्वस्थ करून गेले. त्यांनी मग लगेच ओम साई फाऊंडेशन ला संपर्क केला आणि घटना स्थळी पोचले.  फाऊंडेशन चे जाबाज कार्यकर्ते पण लगेच प्रश्नाचं उत्तर घेऊनच घटना स्थळी पोचले. असंख्य अडचणींचा सामना करत तब्बल दोन तासांच्या rescu operation नंतर ते वासरू बाहेर आले. आणि उपस्थितानी टाळ्यांचा गजर केला... आणि यंदाच्या दिवाळीत वसुबारसच्या गोपूजनाचा मान ओम साई फाऊंडेशनलाच अर्पण केला...या वासराच्या रेस्कु ऑपेरेशन मध्ये ओम साई फाऊंडेशन तर्फे विलास निबोळकर अजय गवई, कृष्णा नालट,  कमलेश बोके, वैभव मनवर, मनोज चिम, कृष्णा वसोकार श्रीधर सोनवणे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तर ठाणेदार विलास पाटील सर, चंद्रकांत इंगळे साहेब व वाघमारे साहेब यांनी पूर्णवेळ थांबून पोलीस वर्दीतील माणुसकीचा परिचय दिला.

Previous Post Next Post