शेवटच्या दिवशी अकोटात ३० उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल..वाजतगाजत उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन...


 
शेवटच्या दिवशी अकोटात ३० उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल..वाजतगाजत उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन...

सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...

अकोट विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.नामांकन अर्ज दाखल करण्याचा मंगळवार शेवटचा दिवस होता.शेवटच्या दिवसापर्यंत अकोट मतदारसंघात एकुण ३० उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत.मात्र उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या तारखेनंतरच निवडणूकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.ललीत सुधाकर बहाळे स्वतंत्र भारत पक्ष,अशोक किसन थोरात अपक्ष,लक्ष्मीकांत गजानन कौठकर अपक्ष,प्रकाश गुणवंत भारसाकळे भाजपा,रामकृष्ण लक्ष्मण ढीगर अपक्ष,दिवाकर बळीराम गवई अपक्ष,महेश सुधाकर गणगणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,डॉ.सुजाता विद्यासागर वानखडे बहुजन समाज पार्टी,अन्सारउल्ला खान अताउल्लाखा अपक्ष,दीपक रामदास बोडखे वंचित बहुजन आघाडी,गोपाल जीवनराम देशमुख अपक्ष,गजानन शेषराव महाले अपक्ष,गजफ्फरखा मुजफ्फरखा अपक्ष,रामप्रभू गजानन तराळे अपक्ष,देवेंद्र अशोक पायघन अपक्ष,यावरअली सै.मुकद्दरअली अपक्ष,सुनिल गोपाळराव डोबाळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना,सादीक अब्दुल खालीक अपक्ष,सै. मुजाबीरउर रहेमान अपक्ष,सुभाष श्रीराम रौंदळे अपक्ष,यशपाल यशवंत चांदेकर पिपल्स पार्टी ऑफ इंडीया (डेमोक्रेटीक) या उमेदवारांनी आज शेवटच्या दिवसापर्यंत आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत.नामनिर्देशन पत्रांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजतापासून सुरू होणार आहे.तर नामनिर्देशनपन्न ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत उमेदवारास माघार घेता येणार आहे.त्यामुळे अकोट विधानसभेसाठी किती उमेदवार रिंगणात राहणार आहेत,हे ४ नोव्हेंबर नंतरच स्पष्ट होणार आहे.प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर प्रचाराला सुरूवात केली आहे.सध्या रात्रीच्या सुमारास सुध्दा उमेदवार ठामीण भागात फिरत असल्याचे बोलल्या जात आहे.अकोट विधानसभा मतदार संघात मोठ्या संख्येने उमेदवारांनी नामांकन दाखल केल्याने सर्वच पक्षात बंडखोरी झाल्याचे चित्र दिसत आहे.मात्र या बंडखोरांना आपल्या तंबूत घेण्यासाठी कशाप्रकारे व्युहरचना आखल्या जाते है आता येत्या काळात पहावयास मिळणार आहे.

--पोपटखेड रोड रॅलींनी गजबजला--

आज सकाळपासून उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह वाजतगाजत पोपट खेड रोडवरील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय गाठले.मंगळवारी दिवसभर या मार्गावर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली.एकामागे एक अशा उमेदवारांच्या रॅल्या दिसत होत्या.त्यामुळे कोणता कार्यकर्ता कोणाच्या रॅलीत सामील आहे हे अनेकांना उमगू शकले नाही.

Previous Post Next Post