एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी अजिंक्य उमाळेची निवड..जी एम सी जालना येथे एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र...


 
एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी अजिंक्य उमाळेची निवड..जी एम सी जालना येथे एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

यावर्षी नीट परीक्षेच्या निकालानंतर बहुमानाच्या समजल्या जाणाऱ्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशा साठी विद्यार्थ्यांना खूप प्रतीक्षा करावी लागली..... नुकत्याच मेरिट लिस्ट नुसार जाहीर करण्यात आलेल्या यादीत जळगाव जामोद शहरातील अजिंक्य उमाळे या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना या ठिकाणी एमबीबीएस साठी प्रवेश मिळाला आहे.... एमबीबीएस प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेत अजिंक्य उमाळे यास 534 गुण प्राप्त झाले होते.... दरम्यान पेपर फुटी आणि परीक्षेतील अनियमित्यमुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना यावर्षी खूप प्रतीक्षा करावी लागेल.... त्यानंतर जाहीर झालेल्या यादीमध्ये अजिंक्य उमाळे यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.... कठोर मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर अजिंक्यने मिळवलेले हे यश जळगाव जामोद तालुक्यासाठी एक गौरवास्पद बाब असून सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पात्र ठरल्याने इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच्याकडून प्रेरणा मिळत आहे.... अजिंक्य चे वडील शहरातील एका खाजगी शाळेत नोकरीला असून आई जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहे..... आई-वडिलांनी मुलांना दिलेले संस्कार आणि स्वतःच्या क्षमता विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेली कठोर मेहनत अखेर साकार झाली असून जिद्द,मेहनत आणि आत्मविश्वास ठेवल्याने जगात अशक्यप्राय अशी कोणतीच गोष्ट नसल्याचे प्रतिपादन याप्रसंगी अजिंक्य उमाळे यांने आपली प्रतिक्रिया देताना सांगितले.... अजिंक्य उमाळेच्या  या यशाबद्दल त्याचे आई-वडील मित्रपरिवार तसेच शिक्षकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे....

Previous Post Next Post