विधानसभेच्या उमेदवारी करिता बहुजन समाज पार्टीच्या मुलाखत कार्यक्रमात सुनगाव येथील विनोद दादा इंगळे यांनी दिली मुलाखत...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
समाजसेवेचा वसा घेत समाजकारणासोबतच राजकारणाच्या माध्यमातून जनसेवा हेच ब्रीद उराशी बाळगून सुनगाव येथील तरुण तडफदार युवा नेतृत्व विनोद दादा इंगळे यांनी दिनांक २० आक्टोंबर रोजी विद्यादिप रेसिडेन्सी येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने विदर्भ स्तरीय उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. यावेळी जळगाव जामोद मतदार संघाची उमेदवारी मिळावी याकरिता जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील विनोद सुखदेव इंगळे जळगाव जामोद विधानसभा ०२७ मतदार संघासाठी त्यांची उमेदवारी मुलाखत संपन्न झाली यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी नर्मदा प्रसाद अहिरवार साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनीलजी डोंगरे साहेब तसेच ओबीसीचे नेते बिले साहेब तसेच बुलढाणा जिल्हा प्रभारी धरमपाल इंगळे साहेब जिल्हा अध्यक्ष विलास तायडे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग गवई जळगाव जामोद विधानसभा अध्यक्ष संतोष भगत यांचे उपस्थितीत वर्धा येथे कार्यक्रम पार पडला विनोद सुखदेव इंगळे सूनगाव यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपला उमेदवारी मागणी अर्ज सादर केलेला आहे बहुजन समाज पार्टीच्या जळगाव जामोद विधानसभा ०२७ मतदार संघासाठी उमेदवार म्हणून जवळपास त्यांची निश्चिती झालेली आहे व ते लवकरच उमेदवारी अर्ज भरून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले..
