सहाय्यक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांचे पथक व हिवरखेड पोलिसांची संयुक्त धाडसी कारवाई.१६ गोवंशांना दिले जीवनदान...
सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
दि.२३ ऑक्टोबर रोजी रात्री सहाय्यक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सहायक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांचे मार्गदर्शनात त्यांचे विशेष पथक आणि हिवरखेड ठाणेदार गजानन राठोड पोलीस उपनिरीक्षक श्रीराम जाधव यांचे नेतृत्वात पोलिसांनी धाडसी कारवाई करीत कत्तलीला जाणाऱ्या सोळा गोवंशांना जीवनदान दिले. सदर धाडसी कारवाई अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील मेळघाट सारख्या दुर्गम क्षेत्राच्या पायथ्याशी झरी जवळ करण्यात आली. सदर क्षेत्र हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येतो. येथून जवळच मध्य प्रदेशची सीमा लागते. सदर कारवाई सहायक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांचे मार्गदर्शनात त्यांचे विशेष पथक आणि हिवरखेड ठाणेदार गजानन राठोड पोलीस उपनिरीक्षक श्रीराम जाधव महादेव नेवारे, प्रफुल्ल पवार, अनंता मुळे, मो. सादिक, शैलेश काळपांडे यांचे सह अकोट आणि हिवरखेड पोलिसांनी संयुक्तरीत्या केली.कत्तलीसाठी जाणारे सदर गोवंश जप्त करून सुरवातीला हिवरखेड पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आली. त्यानंतर सर्व प्रक्रिया पार पाडून सदर गोवंश देखभाली करीता अकोट येथील गोरक्षण ला पाठविण्यात येणार अशी माहिती पोलीसांनी दिली. सदर गोवंशाचे एकूण किंमत २,६४,००० असल्याची माहिती मिळाली. या घटनेत दोन आरोपी घटनास्थळा वरून फरार झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
