नांदुरा जळगाव मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल व्हावा या मागणीसाठी काँग्रेस कमिटीचे मुकुल वासनिक यांना निवेदन...


 
नांदुरा जळगाव मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल व्हावा या मागणीसाठी काँग्रेस कमिटीचे मुकुल वासनिक यांना निवेदन...

जळगाव जामोद प्रतिनिधी-

नांदुरा ते जळगाव महामार्गाच्या मधोमध असलेल्या रेल्वे लाईन वर रेल्वे गेट बंद झाल्याने मोठी गर्दी होत असते त्यामुळे कित्येक वेळा ॲम्बुलन्समधील उपचाराची गरज असलेल्या पेशंटला आपला जीव गमवावा लागत आहे. तर किती वेळा या रेल्वे गेटवर मोठे अपघात सुद्धा घडलेले असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो.तसेच गेल्या कित्येक वर्षापासून नांदुरा जळगाव रेल्वे लाईन वरील उड्डाणपूलाची मागणी सातत्याने होत असून आजपर्यंत ही रेल्वे लाईन वर उड्डाणपूल झालेला नाही. अशातच काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी मंत्री भारत सरकार मुकुल वासनिक यांना नांदुरा ते जळगाव जामोद रेल्वे लाईन वरील उड्डाणपूल लवकरात लवकर बांधण्यात यावा या मागणीचे निवेदन २२ ऑक्टोबर रोजी देण्यात आले. यावेळी निवेदन देताना काँग्रेस पक्षनेत्या डॉक्टर स्वातीताई वाकेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील,एम आसिफ इकबाल, राजेश्वर विक्रमराव देशमुख, डॉक्टर संदीप वाकेकर, समाधान दामधर, अख्तर भाई मोरे, शामराव डाबरे, राजेंद्र वानखडे, सतीश टाकळकर यावेळी उपस्थित होते.

Previous Post Next Post