स्व.ऍड. वासुनाना डीडोळकर व स्व. ऍड. अजय डीडोळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जनता विद्यालयाला वाद्यसाहित्य संच भेट...


स्व.ऍड. वासुनाना डीडोळकर व स्व. ऍड. अजय डीडोळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जनता विद्यालयाला वाद्यसाहित्य संच भेट...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

दिनांक 3 तारखेला जनता विद्यालय जामोद येथे स्व. वासुनाना डीडोळकर व स्व. अजय  डीडोळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जनता विद्यालय येथे कार्यरत अध्यापिका श्रीमती स्मिता डीडोळकर व श्रेयस डीडोळकर यांनी दैनदिन शालेय कामकाजात उपयुक्त असणारा एक मोठा ड्रम, दोन आणक, एक झांजा व एक ट्रँगल असा एक वाद्यसंच जळगाव शिक्षण मंडळाचे सचिव अनुप पुराणिक यांच्याकडे सुपूर्द केला. विद्यालयात पार पडलेल्या या छोट्याखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव शिक्षण मंडळाचे सचिव अनुप पुराणिक तर प्रमुख उपस्थिती मध्दे मुख्याध्यापक राजेंद्रसिंह राजपूत, पर्यवेक्षक अभिजीत कुलकर्णी, श्रीमती स्मिता डीडोळकर व श्रेयस डीडोळकर होते. यावेळी अनुप पुराणिक यांनी आपल्या मनोगतात माझ्या जडणघडणीत वासुनाना डीडोळकर यांचा कसा सिंहाचा वाटा हे अनेक संदर्भ देऊन व भावनिक होऊन स्पष्ट केल्या व त्यांच्या आठवणी सुद्धा ताज्या केल्या. यावेळी श्रेयस डीडोळकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभाप्रदर्शन रजनीकांत उपासे यांनी केले.

Previous Post Next Post