पुरस्काराची रक्कम दिली शाळेला दान;शिक्षक उमाळे यांचा स्तुत्य उपक्रम...


पुरस्काराची रक्कम दिली शाळेला दान;शिक्षक उमाळे यांचा स्तुत्य उपक्रम... 

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

पैसा देव नाही पण देवापेक्षा कमीही नाही अशी पैशांची महती सर्वत्र गायीली जाते परंतु आजही पैशांपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजणाऱ्या प्रामाणिकपणाची उदाहरणे समाजात पाहावयास मिळतात.. जळगांव जा तालुक्यातील आदिवासी भागात ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या उपक्रमशील शिक्षक दिपक उमाळे यांना लॉयन्स क्लब व धन्वंतरी चारिटेबल मेडीकल फाऊंडेशनच्या खामगाव च्या वतीनेही स्व. बावस्कर गुरुजी स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच प्राप्त झाला.यावेळी पुरस्काराची पाच हजार एक रुपये रोख रक्कम शिक्षक दिपक उमाळे यांनी एका कार्यक्रमात त्यांच्या चारबन शाळेला दान दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त दि 3ऑगस्ट गुरुवारला जि. प. शाळा चारबन येथे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप व भोजनाचा कार्यक्रम गोविंद अग्रवाल यांचे कडून आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात शिक्षक दिपक उमाळे यांनी शाळा व्यवस्थापन समितीला पुरस्काराची रोख रक्कम सुपूर्द केली. यावेळी उपस्थित गोविंद अग्रवाल,शीतल अग्रवाल, साई प्रिया अग्रवाल,डॉ विनीत गांधी, लखन अग्रवाल, नीलिमा शेळके व शाळा व्यवस्थापन समिती चारबन व शिक्षक वृंद यांच्या तर्फे शिक्षक दिपक उमाळे यांचा सत्कार करण्यात आला.डोंगराळ आदिवासी भागातील जि. प. शाळा चारबन ला आजपर्यंत कॉम्प्युटर, प्रोजेक्टर, 4 टीव्ही, 6 पंखे, इन्व्हर्टर व इतर सर्व भौतिक सुविधा शिक्षक उमाळे यांनी लोकवर्गणीतून मिळविल्या आहेत हे विशेष!

Previous Post Next Post