लोहार समाजाच्या भवनासाठी निधी कमी पडू देणार नाही - आ. ॲड. आकाश फुंडकर..लोहार समाजाकडून आ. फुंडकरांचा सत्कार...


 
लोहार समाजाच्या भवनासाठी निधी कमी पडू देणार नाही - आ. ॲड. आकाश फुंडकर..लोहार समाजाकडून आ. फुंडकरांचा सत्कार...

सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

लोहार, गाडीलोहार आणि जिनगर समाजासाठी जागा आणि भवन निर्मितीचा दिलेला शब्ध विद्यमान आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी पुर्ण केला आहे. 13 ऑक्टोबर रोजी येथील सोमवंशी आर्य क्षत्रिय लोहार समाजाच्या नियोजित जागेचे भुमिपूजन आणि लोहार भवन बांधकामाचे आ. ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते थाटात भुमिपूजन करण्यात आले. यावेळी समाजाकडून आ. ॲड. आकाश फुंडकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना आ. फुंडकर म्हणाले की, लोहार समाजाच्या विकासासाठी तसेच भवन निर्मितीसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. यावेळी आयोजित कार्यक्रमाला मंचावर सोमवंशी आर्य क्षत्रिय गाडी लोहार समाजाचे जेष्ठ अध्यक्ष डिगांबर मानेकर, सचिव प्रविण घवाळकर, सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाचे युवा अध्यक्ष अनुप गवळी, मुन्नाभाऊ जाधव, अनिल नगरे, भास्कर हरीहर, भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी ज्ञानदेव मानकर, पवन गरड आदिंची उपस्थिती होती.यावेळी प्रास्ताविकेत समाजाचे अध्यक्ष अनुप गवळी यांनी मागील 50 वर्षापासून लोहार समाजाला हक्काची जागा मिळवून देण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाही. विद्यमान आ. ॲड. आकाश फुंडकर यांच्याकडे समजाला सभागृह निर्मितीसाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्याबाबत मागणी करताच त्यांनी मागणीची दखल घेवून समाजाला जागा उपलब्ध करून दिली. तसेच समाजाच्या सभागृह निर्मितीसाठी 30 लक्ष निधी मंजूर करून दिला. याबद्दल समस्त लोहार समाजाकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून आ. ॲड. फुंडकर यांनी समाजाला मार्गदर्शन करतांना म्हणाले की, नेहमीच लोहार समाजाने माझ्यावर प्रेम केले आहे. समाजाच्या विकासासाठी आणि भवन निर्मितीसाठी निधी कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही यावेळी आ. फुंडकर यांनी लोहार समाज बांधवांना दिली. यावेळी समाजातील सौ. क्षितीजा मानेकर यांची जि.प. बांधकाम उपविभागात अभियंता म्हणून नियुक्ति झाल्याबद्दल त्यांचा आ. आकाश फुंडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाला हक्काची जागा आणि भवन निर्मितीसाठी अथक परिश्रम करून स्वप्नपुर्ती केल्याबद्दल समाजाचे अध्यक्ष अनुप गवळी यांचाही आ. आकाश फुंडकर व समाजबांधवांकडून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सिध्दार्थ वानखडे यांनी तर आभार प्रदर्शन पत्रकार महेंद्र बनसोड यांनी केले. कार्यक्रमाला लोहार, गाडीलोहार व जिनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post