पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा..विहिंप व बजरंग दलाचे जिल्हाभरात धरणे आंदोलन...


 
पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा..विहिंप व बजरंग दलाचे जिल्हाभरात धरणे आंदोलन...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

नांदुरा तालुक्यातील वडणेर भोलजी येथे दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी काही समाजकंटकांनी ईदच्या मिरवणूकीमध्ये पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्याचे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये निदर्शनास आल्याने यासंदर्भात नांदुरा येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल पदाधिकाऱ्यांनी दखल घेत पोलीस स्टेशन नांदुरा यांना विश्व हिंदु परिषद व बजरंग दल कडून तक्रार दिली आहे. परंतु सदर तक्रारीमध्ये नमूद असताना देश विघातक कृत्य करणाऱ्या लोकांवर कोठेही राष्ट्रद्रोही, देशद्रोहाचा गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही तरी सदर व्हिडिओ मध्ये स्पष्ट असताना व व्हिडीओ त्याच गावातील मुस्लिम समाजातील नागरिकानी स्टेटस, फेसबुकवर व्हायरल केला असताना सदर पुरावे असून सुद्धा देशद्रोहाची कलम लावण्यात आलेली नाही तरी निवेदनाद्वारे विहिंप व बजरंग दलाकडून तीव्र रोष व्यक्त करून सदर घटनेचा निषेध करीत निवेदन देत सदर गुन्ह्याची लवरकरात लवकर चौकशी करून पाकिस्तान जिंदाबाद चे नारे देणाऱ्या देशद्रोही समाजकंटकांवर कडक कारवाई चे आदेश संबंधित विभागास देण्यात यावे नांदुरा पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या अपराध क्र.०५५३/२०२४ मध्ये देशद्रोह कलम लावण्यात यावे तसेच देशविरोधी शक्तींनी सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये डोके वर काढल्याची घटना दिवसेंदिवस वाढत चालली आहे अशीच घटना बाजूला अकोल्यात आतंकवादयाचे पोष्टर ईद च्या मिरवणूकीमध्ये लावल्याचे दिसून आले त्यामुळे अशा मानसिकतेच्या समाजकंटकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे जेणेकरून अशा प्रवृत्तीच्या मानसिकतेला आळा बसेल व देशाचे वातावरण गढूळ करणाऱ्या मानसिकतेला समज मिळेल तरी सर्व भारतीय समाजव्यवस्था व समाज बांधवांचा विचार करून देशद्रोह अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा बजरंग दल लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल व आंदोलनाची सर्व जबाबदारी संबंधित विभागाची राहील अशा आशयाचे निवेदन आज दिनांक १ आक्टोंबर रोजी जिल्हा भर देण्यात आले. यावेळी बजरंग दल जिल्हा सहसंयोजक नंदु दलाल,तालुका संयोजक ज्ञानेश्वर कराळे, तालुका अध्यक्ष अँड शशिकांत गुप्ता,नगर मंत्री अँड विजय धर्मे,शहर संयोजक गिरीश काळे, अजय वंडाळे,रितेश डोबे, अक्षय काकड,सुरज कोथळकार, गणेश धांडे, राजेश काचकुरे यांच्यासह मोठ्या संख्येने विहिंप, बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post