सम्यक विद्यार्थी आंदोलन नवनियुक्त पदाधिकारी सत्कार सोहळा व संघटनात्मक बांधणी मार्गदर्शक कार्यक्रम संपन्न...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-
गुरुवार दि.3 ऑक्टोबर 2024 रोजी स्थानिक विश्रामगृह येथे सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्हा पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली.सम्यक विद्यार्थी आंदोलन हे विद्यार्थी संघटन बुलढाणा जिल्ह्यात मजबूत करण्यासाठी व येणाऱ्या काळातील संघटनेचे भुमिका पदाधिकार्यांना समजून सांगण्यासाठी जिल्हा अध्यक्ष मोहित दामोदर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला व उपस्थितांनी विविध विषयांवर मांडणी केली, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सम्यकचे शहरध्यक्ष अब्दुल नावेद, उद्घाटक जि.सचिव राज वानखडे, सुत्रसंचलन सुमेध सांवग यांनी केले.यावेळी मोहम्मद सोहिल, मोहम्मद समीर, सुमित पुंडकर, प्रज्वल वाडेकर, शुभम विरशीद, विनोद सांवग, विकी गवई, रितेश तायडे, प्रथमेश डोंगरे, अशोक बोदडे, अरविंद खंडारे, राहुल आठवले, मानस गवळी, अभिजित शेगोकार व सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्हात पदाधिकारी उपस्थित होते..!
