● शेगावात लाडक्या बहिणी देणार लाडक्या भावाला साथ !काॅर्नर बैठकीना महिलांचा भरभरून प्रतिसाद...लाडक्या बहिणीच सांभाळणार प्रचाराची धुरा...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी-
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर महायुतीचे उमेदवार आ डॉ.संजयजी कुटे यांच्या प्रचारार्थ शेगाव शहरातील केशव नगर,गणपती नगर,तिन पुतळा परिसर, माळीपुरा,बाजार फैल , शिवनेरी चौक,सुरभी काॅलनी भागात डाॅ अपर्णाताई कुटे यांच्या मार्गदर्शनात काॅर्नर बैठकी घेण्यात आल्यात.येत्या २८ तारखेला जळगाव जा येथे महायुतीचे लोकप्रिय आमदार डॉ.संजयभाऊ कुटे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत.मातृशक्ती व लाडक्या बहिणीनी मोठ्या संख्येत सहभागी होवून ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार होण्याचे आवाहन डाॅ अपर्णाताई कुटे यांनी ठिकठिकाणच्या बैठकीत केले.भाजपा प्रदेश सदस्य तथा महायुतीचे समन्वयक प्रदीपभाऊ सांगळे यांनी महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. आमदार डॉ.संजयभाऊ कुटे यांचे संकल्पनेतून विविध योजनांचा लाभ लाडक्या बहिणींना मिळत असल्याचे सांगून लाडक्या भावाला साथ देण्याचे आवाहन केले.20 नोव्हेंबर रोजी भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे अधिकृत उमेदवार डाॅ संजयभाऊ कुटे यांच्या कमळ निशाणी बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन शेगाव शहर विस्तारक चंदाताई पुंडे यांनी केले.जळगाव जा मतदार संघातील शेगाव शहराचा झालेला विकास पाहता शेगावकर जनतेने व लाडक्या बहिणींनी हा मतदार संघ महाराष्ट्रात नंबर वन बनविण्यासाठी आ डॉ.संजयभाऊ कुटे यांना भरभरून मतदानरूपी आशिर्वाद द्यावेत,अशी विनंती विधानसभा संयोजिका योगिताताई टापरे यांनी केली.माजी न प अध्यक्षा सौ शकुंतलाताई बुच, कल्पनाताई मसने,माजी न प उपाध्यक्षा ज्योतीताई कचरे,महिला उपाध्यक्ष मंजूताई शर्मा,डाॅ ज्योतीताई भुतडा,रूपालीताई अनंता बरडे,चेतनाताई खेते,वंदना अमित जाधव,प्रितीताई तिवारी,शारदा उंबरकर यांचीही उपस्थिती होती.दिनांक 26 ऑक्टोबर शनिवार रोजी शहरात विविध ठिकाणी महिलांच्या भरगच्च उपस्थितीत काॅर्नर बैठकी झाल्या.यात दुपारी ठीक ४:०वाजता केशवनगर जानोरी रोड परिसर या भागात सांगोळे ताई यांचे घराजवळ , दुपारी ठीक ४:30 वाजता गणपती नगर संगीता आखरे यांची घरी, सायंकाळी ठीक ५ वाजता सुषमाताई शेगोकार यांचे घरी तीन पुतळे परिसर नागझरी रोड भागात, सायंकाळी ठीक ५:30 वाजता माळीपुरा प्रणिता कलोरे यांचे घरी, सायंकाळी ठीक ६:०० वाजता भैरव चौक मनीषा शर्मा,सायंकाळी ठीक ६:30 वाजता शिवनेरी चौक किरण शर्मा यांचे घरी बैठकी पार पडल्या.तसेच रात्री 8 वा सुरभी काॅलनीमध्ये माजी नगर पालिका उपाध्यक्षा ज्योतीताई कचरे यांच्या नेतृत्वात झालेल्या सभेला महिलांची लाक्षणिय उपस्थिती होती.बैठकांचे उत्कृष्ट संचालन भाजपा महिला शहराध्यक्षा अंजलीताई जोशी यांनी केले.
