अकोटमध्ये परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार ललित बहाळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल..बच्चू कडू यांची प्रमुख उपस्थिती...
सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
अकोट येथील शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे यांनी प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थित व प्रहार पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.उमेदवारी अर्ज दाखल करताना ललित बहाळे समर्थकांनी व प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत माता मैदानातून रॅली काढली.यावेळी आकर्षक बैलजोडी सजविण्यात आली व बैलबंडीतून भजनी मंडळासह मिरवणूक काढण्यात आली.शिवाजी महाराज चौकात मिरवणूक थांबवून शिवाजी महाराजांना वंदन करून मिरवणूक पुढे निघाली.या प्रसंगी आकोट व तेल्हारा परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. नामांकन दाखल केल्यावर सप्तपदी मंगल कार्यालय जाहीर सभा घेण्यात आली.याप्रसंगी बच्चू कडू,ललित बहाळे यांनी शेतकरी व उपस्थितांना संबोधित केले.याप्रसंगी व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व प्रहारचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.सभेचे संचालन धनंजय मिश्रा यांनी तर प्रास्ताविक सतीश देशमुख यांनी केले.
