परसापुर ते बोराळा मार्गे मोरगड नागापूर डांबरीकरण रस्त्याचे काम थंड बस्त्यात..याला जबाबदार कोण?


 
परसापुर ते बोराळा मार्गे मोरगड नागापूर डांबरीकरण रस्त्याचे काम थंड बस्त्यात..याला जबाबदार कोण?

राजु भास्करे/अमरावती

अचलपूर तालुक्यातील परसापुर ते चिखलदरा तालुक्यातील बोराळा मार्ग मोरगड तसेच बोराळा मार्गे नागापुर, टेब्रुसोंडा या दोन रसत्याचे कामे एकदम कासव गतीने सुरु असुन या रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडले असुन या रस्त्यावर येजा करणा-यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.याला  जबाबदार एकदम सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असल्याचे बोलले जात आहे.चार -पाच दिवसात या दोन गावाचे रस्ताचे कामे लवकर सुरु नाही झाल्यास तर मेळघाट आदिवासी संघटना ही रस्तावर उतरणार असल्याचे समजले जात आहे.या रस्त्यावर कोणाची जिवंत हानी झाल्यास याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी राहणार आहे. असे म्हणने येजा करणारे कर्मचारी, अधिकारी व या रस्त्यावर लगतचे गावक-याचे आहे.

Previous Post Next Post