आसलगांव सर्कल मध्ये आ.डॉ. संजय कुटे यांच्या निधीमधून विविध विकासकामांचे भूमी पूजन व लोकार्पण सोहळा संपन्न...


 
आसलगांव सर्कल मध्ये आ.डॉ. संजय कुटे यांच्या निधीमधून विविध विकासकामांचे भूमी पूजन व लोकार्पण सोहळा संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

आसलगांव सर्कल मध्ये आमदार निधी अंतर्गत मंगलेश्वर भवन येथे सभागृह, मातंग समाज स्मशानभूमी, आसलगाव ते पिंपरी रस्ता, हनुमान मंदिर मोठे खेडे सभागृह व पेव्हर ब्लॉक अशा अनेक विकास कामांचे आसलगाव मध्ये उद्घाटन तथा लोकार्पण सोहळा माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे यांच्या धर्मपत्नी डॉ. सौ. अपर्णाताई कुटे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच आसलगाव सर्कल मधील अकोला खुर्द, गाडेगाव खुर्द, सावरगाव, धानोरा, वडगाव गड, या गावांमध्ये आमदार डॉ. संजय कुटे यांच्या विकास निधीतून विविध कामांचे लोकार्पण व उद्घाटन सोहळा संपन्न झाला.प्रसंगी भाजपा नेत्या योगिताताई टापरे, राज्य परिषद सदस्य गुणवंत कपले, लहू भारसाकडे, तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ, श्रीकृष्ण भेलके, रवी पाचपोर, जळगाव जामोद मतदारसंघाचे विस्तारक गणेश भोपळे, बंडू पाटील, आसलगाव सरपंच विष्णू इंगळे, एकनाथ वनारे माजी पंचायत समिती सदस्य तथा भाजप नेते श्याम देवताळु, तालुका सरचिटणीस गणेश गावंडे,योगेश मावळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख देविदास घोपे, भगवान टापरे, माजी उपसरपंच गणेश गिऱ्हे, मनोज भारसाकडे, विजय मांगटे, रमेश निर्मळ, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post