मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त सद्भावना मोटरसायकल रॅलीचे आयोजन संपन्न... काँग्रेसने दिला सद्भावनेचा संदेश माजि जि.प अध्यक्ष प्रकाश पाटील..


 
मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त सद्भावना मोटरसायकल रॅलीचे आयोजन संपन्न... काँग्रेसने दिला सद्भावनेचा संदेश माजि जि.प अध्यक्ष प्रकाश पाटील..

मंगल काकडे/जळगाव जामोद...

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्याच बरोबर माजि केंद्रीय मंत्री व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव  मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जळगाव जामोद संग्रामपूर व शेगाव शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या संकल्पनेतून सद्भावना मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मागील काही काळामध्ये जळगाव जामोद मतदारसंघांमध्ये घडून आणलेल्या जातीय दंगली व त्यामुळे जनसामान्यांमध्ये जो एक रोष निर्माण झाला मनांमध्ये दुफळी तयार झाली हे सावरण्यासाठी व शांतता निर्माण करण्यासाठी जळगाव जामोद मतदारसंघांमध्ये पिंपळगाव काळे ते जळगाव शहर सूनगाव, जामोद, टूनकी, सोनाळा मार्गे वरवट बकाल, शेगाव पर्यंत सद्भावना मोटरसायकल रॅली काढण्यात आली आणि या रॅलीच्या मार्फत ज्या ज्या ठिकाणी अनुचित प्रकार या मतदारसंघांमध्ये घडला त्या त्या ठिकाणी शांततेचा संदेश देत एकात्मतेचा संदेश देत भाईचाराचा संदेश देत ही यात्रा निघाली. एकीकडे काँग्रेस पक्ष जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडून त्यांच्यासाठी कार्य करत मार्गक्रमण करीत आहे तर दुसरीकडे मतदारसंघांमध्ये खोटा तगारी विकासाच्या नावावर जी भूमिपूजन करण्यात आली त्यामध्ये ज्यांनी देशाच्या स्वतंत्र लढ्यामध्ये नेतृत्व घेऊन आपल्या जीवाची परवा न करता सर्वांना सोबत घेऊन या देशांमध्ये इंग्रजांपासून मुक्ती देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून आपली भूमिका निभावली त्याचबरोबर आपल्या देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी या देशाच्या विकासाच्या जडणघडणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावत या देशाचे दोन मुख्य असलेले स्तंभ  त्यामध्ये आपल्या सीमेचे रक्षण करणारे जवान व या देशांमध्ये सर्वांना अन्नधान्याची पूर्तता करण्यासाठी मेहनत करणारे किसान यांना प्रथम स्थानी ठेवून जय जवान जय किसान चा नारा दिला आणि या देशामध्ये एकात्मता त्याबरोबर विकासात्मकही जळणघडण त्यांनी घडवून आणली पण दुर्दैवाने आज म्हणावा लागते या मतदारसंघांमध्ये २ ऑक्टोंबर या तारखेला महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या असलेल्या उपकाराचे जाण नसलेल्या सत्ताधारी लोकांनी लाखो रुपयांच्या भूमिपूजनाच्या आणि लोकार्पणाच्या जाहिरातीमध्ये स्वतःचा वाजा गाजा केला पण  कुठल्याच या प्रसिद्धी जाहिरातीमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना स्थान देता आले नाही व त्यांच्या मनातील त्यांच्याबद्दल असलेला रोष या गोडसे च्या भक्तांनी या ठिकाणी दाखवून दिला,कुठेतरी या देशाच्या स्वतंत्रता संग्रामात ज्या स्वातंत्र सैनिकांनी आपल्या जीवाचं रान केलं आपली आहुती दिली व देश विकासात्मक दृष्टिकोनातून पुढे नेला अशा थोर महापुरुषांना नमन करून जळगाव जामोद मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन करून त्यांच्या कार्याला सलामी देत त्यांची आठवण करीत त्यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम याप्रसंगी या सद्भावना रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले.या यात्रेमध्ये सोनाळा येथील स्वप्निल देशमुख यांनी यात्रेचे स्वागत करून फराळाची व्यवस्था व त्याचबरोबर शेगाव संत नगरीमध्ये रामविजय बुरुंगले यांनी संपूर्ण सहभागी कार्यकर्त्यांची जेवणाची व्यवस्था केली. सद्भावना रॅलीचे समारोह शेगाव स्थित गांधी चौकामध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करून त्यांच्या नावाचा जयघोष करून त्याचबरोबर मा.खा.मुकुल वासनिक यांना वाढदिवसाच्या व आरोग्यदायी जीवनाच्या शुभेच्छा देत स्वाती वाकेकर, रामविजय बुरुंगले, यात्रेचे संयोजक प्रकाश  पाटील, शेगाव शहराध्यक्ष किरणबाप्पू देशमुख,अविनाश उमरकर, समाधान दामधर , ॲड. भालेराव,शैलेंद्र पाटील, अशोक हिंगणे, केशव हिंगणे, कैलासबाप्पू देशमुख ,दीपक सलामपूरिया, बसंत शर्मा , बाबु जमदार, राजेशश्वर देशमुख, प्रमोद पाटिल,  श्याम डाबरे, गजानन ढगे, निशिकांत देशमुख, स्वप्निल देशमुख, राजेंद्र वानखडे, दीपक  काटोले,  रौंदळे सर, अर्जुन घोलप, श्रीकृष्ण केदार,  अझहर देशमुख,  शेख राजिक, शेख  जहीर.  दिनेश काटकर,  अजय राजपूत, मीराताई माळी, राजवैद्य ताई,शिवाजी बुरुंगले, बळीराम धुळे, नासीर सैलानी, माजी नगरसेवक सैयद अफरोज,सैय्यद बाहोद्दिन,जुबेर पटेल,नंदु चोपडे,शालिग्राम यादगिरे, सुभाष हुरसाळ, संतोष भालेराव, सरपंच शेख हारूण, विनोद तायडे, प्रशांत गावंडे. सतीश टाकळकर ,राजू राठोड,सचिन जाधव, सुनील कळसकर, मयूर राऊत, अजय ताठे, सुरेश चोखंडे, किशोर घटे, देवेंद्र भालेराव, असे दोनशेच्या वर मोटरसायकलधारक रॅलीमधे उपस्थीत होते.

Previous Post Next Post