दुर्गाउत्सव दरम्यान जळगांव पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर. जळगाव शहरातील संवेदनशील भागात दुर्गा विसर्जनाच्या दिवशी संचार बंदी.. संवेदनशील भागात दोन पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र जमता येणार नाही...
जळगांव जामोद प्रतिनिधी:-
जळगांव जामोद शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीतील दगडफेक प्रकरणामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी पोलिस निरीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळेतच हस्तक्षेप करून या प्रकरणात तात्काळ शांतता प्रस्थापित केली.आता जळगांव जामोद शहरात दुर्गाउत्सवा दरम्यानअती संवेदनशील असलेल्या संत रुपलाल नगर ते वायलीवेस तसेच ताटीपुराकडे जाणारा रस्ता व चौभारा गल्लीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा सांहिता चे कलम १६३(३) नुसार दोनपेक्षा जास्त लोकांना एकत्रित फिरण्यास मनाई केली आहे.यावेळी पोलिस निरीक्षक श्रीकांत निचळ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये माहिती दिली आहे.तसेच जळगाव जामोद शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की दिनांक १४/१०/२०२४ सकाळी ६ वाजेपर्यंत पर्यंत या भागात दोनपेक्षा जास्त नागरिकांना फिरता येणार नाही. यामध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी यांना हा आदेश लागू नसणार. आदेशाचे उलंघन करणाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई केली जाईल. सदर आदेश हा जळगांव जामोद येथील दुर्गा देवी विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर आपोआप संपुष्टात येईल.
