भाजपाच्या पहिल्याच यादीत आ डाॅ संजय कुटे यांना उमेदवारी जाहीर...आ डाॅ संजय कुटे यांनी मायबाप जनतेचे मानले आभार...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
आज रविवारी भाजपाच्या वरिष्ठ नेते मंडळीच्या मार्गदर्शनात भाजपाची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाची पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर केली.या यादीमध्ये जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघासाठी कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर संजय कुटे यांना उमेदवारी घोषित झाली पाचव्यांदा भाजपाच्या वतीने जगात विधानसभा मतदारसंघासाठी पाचव्यांदा डॉक्टर संजय श्रीराम कुटे यांना उमेदवारी दिल्याने जळगाव जा विधानसभा मतदार संघातील जळगाव जा,संग्रामपूर शेगाव या शहरासह गावा गावात उमेदवारी घोषित झाल्याबद्दल नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने स्वागत केले.तद्वतच भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना वमहायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.तर जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाच्या सेवेसाठी विधानसभेत विधानसभेची उमेदवारी जाहीर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रिय गृहमंत्री अमित शाह,राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी आभार मानले."मागील 20 वर्षात केलेल्या सातत्यपूर्ण जनकल्याणाच्या कामाची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करून जळगाव जामोद मतदार संघातील जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे.श्रीसंत गजानन महाराजांच्या आशीर्वादाने आणि मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांच्या सोबतीने यंदाही विजय आपलाच असेल असा ठाम विश्वासही आ डाॅ संजय कुटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केला."
