बापुमिया सिराजोद्दीन पटेल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सखी सावित्री व विद्यार्थी सुरक्षा बाबत कार्यशाळा संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
स्थानिक बी. एस .पटेल विद्यालय व कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष मा.ॲड.सलीमजी पटेल, सहसचिव श्री रब्बानी देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. कय्युम पटेल, संचालक सिराजोद्दीन पटेल यांच्या मार्गदर्शनात दि 19ऑक्टोबर 2024 रोजी सखी सावित्री व विद्यार्थी सुरक्षा बाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मुकुंद इंगळे होते,तसेच मंचावर मुख्याध्यापक अजित तडवी ,मार्गदर्शक म्हणून आर.एस. पी.जळगाव जा.तालुका समादेशक सहिद पठाण सर . प्रा.किशोर गवई. प्रा.ज्योती पांडव ,सिंधू राऊत मॅडम यांचीही उपस्थिती होती. कार्यशाळेच्या प्रास्ताविकातून मु.अ.अजित तडवी यांनी सखी सावित्री व विद्यार्थी सुरक्षा याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.तर कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले प्रा.किशोर गवई यांनी भारतीय संविधानामध्ये महिलांसाठी असलेल्या विविध कलमांची माहिती दिली.तर आर.एस. पी.तालुका समादेशक सहीद पठाण सर यांनी रस्ता वाहतुकीच्या विविध नियमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य मुकुंद इंगळे यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षा व्हावी या दृष्टीने महाविद्यालयात सी सी.टी.व्ही. कॅमेरे, मुलींच्या सुरक्षे साठी तक्रार पेटी इ.बाबत माहिती विद्यार्थ्यांना दिली.तसेच विद्यार्थी यांनी वाहतुकीच्या विविध नियमांचे पालन करावे, स्वतःची सुरक्षा कशी करावी,मुलींनी नेहमी प्रसंगावधान राखावे व त्यांच्या सुरक्षेसाठी संस्था व महाविद्यालय प्रशासन कटिबद्ध आहे असे प्रतिपादन केले.कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात मुलींसाठी सखी सावित्री समितीच्या वतीने प्रा.ज्योती पांडव व राऊत मॅडम यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी आपण कसे जागृत राहावे या बाबत मुलींना सखोल मार्गदर्शन केले.कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.मंगेश निंबाळकर यांनी केले. तर आभार प्रा.जितेंद्र कचवे यांनी मानले.कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा.पी.पी.जाधव,प्रा.पी. आर.गायकवाड,प्रा.एस.एम.बांगर,दळवी सर,सावरकर सर यांनी परिश्रम घेतले.
