सुनगाव येथील वेदांत कपले ची एमबीबीएस कॉलेज वेदांता इन्स्टिट्यूट पालघरला निवड...


 
सुनगाव येथील वेदांत कपले ची एमबीबीएस कॉलेज वेदांता इन्स्टिट्यूट पालघरला निवड...

जळगाव जामोद प्रतिनिधी-

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील वेदांत कपले ची एमबीबीएस प्रवेशासाठी पात्रता परीक्षा पास झाल्याने त्याची निवड वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर ठाणे येथे झाली असून त्याच्या या निवडीने सुनगाव येथील नागरिकांनी वेदांत व त्याच्या पालकांना शुभेच्छा दिल्या. वेदांत कपले याने बारावीचे शिक्षण जळगाव जामोद येथील सातपुडा सायन्स कॉलेज जळगाव जामोद येथे केले. यावर्षी नीट परीक्षेच्या निकालानंतर बहुमानाच्या समजल्या जाणाऱ्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी खूप प्रतीक्षा करावी लागली नुकत्याच मेरिट लिस्ट नुसार जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये सुनगाव येथील वेदांत कपले याला एमबीबीएस पात्र प्रवेशासाठी परीक्षेमध्ये ५८२ गुण घेऊन त्याचा नंबर तिसऱ्या राऊंडला लागला या अगोदर त्याचा नंबर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ व्हेटेनरी नागपूर ला पण लागलेला आहे. वेदांत कपले हा सुनगाव येथील सुप्रसिद्ध होमिओपॅथिक डॉक्टर प्रल्हाद कपले यांचा मुलगा असून वेदांत कपले याच्या एमबीबीएस प्रवेश पात्र झाल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत असून तो त्याच्या यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षक यांना देतो..

Previous Post Next Post