अखेर जळगाव जामोद मतदार संघाचा तिढा सुटला..सौ.स्वातीताई वाकेकर यांच्या नावाची घोषणा...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
जळगाव जामोद विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा अखेर पाचव्या दिवशी तिढा सुटला अन् माजी आमदार कृष्णराव इंगळे यांची कन्या महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीच्या सचिव सौ. स्वातीताई संदीप वाकेकर यांना पुन्हा महाविकास आघाडीकडून संधी देण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. संजय कुटे यांना काही दिवसांपूर्वी उमेदवारी जाहीर झाली असून त्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू होती, नामांकन अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी कॉग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे. जळगाव जामोद मतदारसंघाचे पक्षनेत्या तथा महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीच्या सचिव सौ. स्वातीताई वाकेकर यांना संधी मिळेल हे जवळपास निश्चित होते त्या अनुषंगाने त्यांनी विधानसभा मतदारसंघात प्रचार यंत्र राबवणे सुरू केले होते अखेर आज काँग्रेसने त्यांचे नाव अधिकृत शिक्कामोर्तब केले.
