खासदार बळवंत वानखडे यांची वर्षवास समाप्ती निमित्त श्रावस्ती बुद्ध विहार सिद्धार्थ नगर येथे सदिच्छा भेट...
सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
विशाखा महिला संघ व क्रांती भीमसेना नवयुवक मंडळ यांचे वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे पठण तीन महिन्या पासून श्रावस्ती बुद्ध विहार सिद्धार्थ नगर अकोट येथे सुरू होते.त्या ग्रंथ पठणाचा अथोचीत समारोह आश्विन पौर्णिमा म्हणजेच वर्षवासा निमित्त करण्यात आला. आषाढ पौर्णिमेला धम्म ग्रंथाचे पठण सुरू करण्यात आले. आषाढ ते आश्विन सलग तीन महिने ग्रंथ पठनाचे धम्मकार्य पूजा नितोने यांनी केले. सदर कालावधित बौद्ध उपासक व उपसिका यांनी ग्रंथ पठण श्रवनाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार बळवंत वानखडे यांनी सदिच्छा भेट देऊन तथागत भगवान गौतम बुद्ध , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन केले. व बौद्ध उपासक व उपासिका यांना धम्माचे मार्गदर्शन केले. श्रावस्ती बुद्ध विहार सिद्धार्थ नगर अकोट येथे प्रथम आगमना निमित्त त्यांचे हारअर्पण व शाल श्रीफळ देऊन सत्कार सागर तेलगोटे यांनी केला. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित महेश गणगणे यांचे स्वागत मथुरा तेलगोटे, प्रशांत पाचडे यांचे स्वागत चेतन तेलगोटे यांनी केले. सदर ग्रंथ पठण समारोप कार्यक्रम दिनांक.२२/१०/२०२४ वार मंगळवार रोजी धम्म भोजनाचे आयोजन विशाखा महिला संघ व क्रांती भीमसेना नवयुवक मंडळाचे वतीने करण्यात आले होते. धम्म ग्रंथ समारोह दिनी सामूहिक वंदना व परित्रान पाठ पूज्य भंते विजयकिर्ती यांचे प्रवचनाने झाले . सदर कार्यक्रमात आनंद तेलगोटे,महेश तेलगोटे,सुगत तेलगोटे, मिलिंद तेलगोटे, विकास तेलगोटे, विक्की तेलगोटे,सूरज तेलगोटे, पंकज तेलगोटे, विशाल तेलगोटे, अरुण तेलगोटे, रोशन धुंदले, अमोल तेलगोटे, स्वप्नील तेलगोटे,बबलू तेलगोटे,मोहन तेलगोटे,गौरव थोरात, नवनीत तेलगोटे,सचिन तेलगोटे, दिनेश तेलगोटे, श्रीकृष्णा तेलगोटे,वैभव दामले,संकेत तेलगोटे,मिलिंद इंगळे,अमर तेलगोटे, पियुस कोल्हे यांचे सह शेकडो क्रांती भीमसेन मंडळ सदस्य व विशाखा महिला संघ चे शेकडो महिला सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मिलिंद नितोने यांनी केले.
