आज जामोद जि. प. सर्कल मधील ६८ कोटी रुपयांच्या कामांचा भुमिपुजन व लोकार्पण सोहळा...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
जळगाव जामोद मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार डाँ संजयजी कुटे यांनी जळगाव जामोद मतदार संघात कोट्यावधींचा निधी खेचत आणत विविध विकास कामे मार्गी लावली असून त्यांच्या विकास कमांची घौडदौड सुरूच आहे. जामोद जिल्हा परिषद सर्कल मधील ६८ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा आज दि. ४ ऑक्टोंबर रोजी भुमिपुजन -निरिक्षण व लोकार्पण सोहळा पार पडत असून यामध्ये जलसंधारणाची कामे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रादेशीक पर्यटन, ब दर्जा तिर्थक्षेत्र, आमदार निधी, सामाजीक न्याय योजना, अल्पसंख्यांक विकास, म.न.रे.गा. जिल्हा वर्षिक योजना, इत्यादी योजनांमधुन सामाजीक सभागृह, अंगणवाडी बांधकाम , जि. प. शाळा बांधकाम, आरोग्य केंद्र बांधकाम, रस्ते बांधकाम, स्मारक बांधकाम , पुतळा सौंदर्यीकरणाची पुर्ण झालेली प्रगती पथावरील व मंजूर असलेल्या जामोद जि.प.सर्कल मधील ६८ कोटी रूपयांच्या कामांचा भुमिपुजन -निरिक्षण व लोकार्पण सोहळा आज पार पडणार आहे यावेळी जळगांव जामोद मतदार संघातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते ,व जामोद जि पं सर्कल मधील असंख्य भा.ज.पा .कार्यकर्ते व नागरीक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
