जळगाव जामोद येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेत तांत्रिक बिघाडामुळे खातेदाराना नाहक त्रास...


जळगाव जामोद येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेत तांत्रिक बिघाडामुळे खातेदाराना नाहक त्रास...

जळगांव जामोद प्रतिनिधी:- 

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आसलगाव मध्ये मागील अनेक महिन्यांपासून सतत तांत्रिक अडचणीमुळे इंटरनेट सुविधा विस्कळीत होऊन बँक खातेदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या बँकेच्या शाखेत गेल्या दोन महिन्यांपासून तर काही बँक खातेरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी लाडक्या बहिणींच्या के वाय सी न झाल्यामुळे त्यांना मुलाबाळांना सोबत घेऊन दररोज बँकेच्या वेळेत चकरा माराव्या लागत आहेत.त्यामुळे तात्काळ बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यांनी तांत्रिक अडचण युध्पपातळीवर दुरुस्त करून खातेदारांना दिलासा द्यावा.

__________________________

आज बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापक यांना भेटून तात्काळ तांत्रिक अडचण दुर करण्यासाठी विनंती केली.दोन दिवसात तांत्रिक अडचण दूर न झाल्यास बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आसलगाव येथे युवासेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला.

अमोल दाभाडे 

युवासेना तालुका प्रमुख जळगांव जामोद

Previous Post Next Post