खामगाव MH 56 : आमदार आकाश फुंडकरांमुळे शहराला मिळाली नवी ओळख..खामगाव येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापनेला मंजुरी !मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे जाहीर आभार – आ.ॲड आकाश फुंडकर...
सुरज देशमुख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाशदादा फुंडकर यांच्या निरंतर पाठपुराव्यामुळे खामगाव शहरासाठी MH-56 नोंदणी क्रमांकासह उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मान्यता मिळाली आहे. खामगावच्या विकासात भर घालणारा हा एक महत्त्वाचा टप्पा असून जिल्हा होण्याच्या दृष्टीने आश्वासक पाऊल मानल्या जात आहे. या बददल आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांनी मुख्यमंत्री मा.श्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व मा.श्री अजितदादा पवार यांचे आभार मानले. दरम्यान आमदार आकाश फुंडकर यांच्यामुळे खामगाव MH 56 अशी शहराला नवी ओळख मिळाली आहे. तर नागरिकांच्या वाहन नोंदणीसाठी बुलढाणा वारीला देखील पूर्णविराम लागणार आहे.बुलढाणा जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्यामुळे जिल्ह्याचे घाटावर व घाटाखाली असे दोन भाग विभागले गेले आहेत. घाटाखालील लोकांच्या सोयीचे होण्यासाठी खामगाव जिल्हा निर्मितीची मागणी अनेक वर्षांपासून होत आली आहे. याबाबत आमदार ॲड आकाशदादा फुंडकर हे अनेक वर्षापासून या मागणीसाठी संबंधीत विभाग व मंत्रालयाशी पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करीत होते. प्रस्तावित खामगाव जिल्ह्यात मलकापूर, नांदुरा, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, खामगाव तालुक्यातील गावांचा समावेश असणार आहे. दरम्यान घाटाखालील जळगाव जामोद व संग्रामपूर या तालुक्यांतील बहुतांश गावे बुलढाणा शहरापासून 100 की.मी. अंतरापेक्षा जास्त अंतर असल्यामुळे वाहन नोंदणीसाठी नागरिकांना हेलपाटे घ्यावे लागत होते. तर बुलढाणा व खामगाव हे अंतर देखील मोठे आहे. त्यामुळे खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी घाटाखालील नागरिकांच्या सोयीसाठी खामगाव शहरात आरटीओ कार्यालय व्हावे अशी मागणी विधानसभेत 29 फेब्रुवारी 2024 रोजी मुद्दा उपस्थित करत शासनाकडे केली होती व सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता. तसा प्रस्ताव सुद्धा बुलढाणा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने पाठविला होता. आमदार आकाश फुंडकर यांच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून 3 ऑक्टोबर 2024 रोजी राज्याच्या गृह विभागाने घेतलेल्या शासन निर्णयानुसार खामगाव येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे MH 56 या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय सुरु करण्यास मान्यता दिली आहे. तर लवकरच कार्यालयासाठी आवश्यक पदे भरण्यात येऊन सदरील नवीन कार्यालय सुरु करण्यासाठी शासकीय / खाजगी मालकीची जागा भाडे तत्वावर घेऊन कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. तसेच नवनिर्मित कार्यालयासाठी 1 इंटरसेप्टर वाहनास सुद्धा मंजुरी देण्यात आली आहे. आमदार ऍड. आकाश फुंडकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आरटीओ कार्यालय खामगाव येथे होणार असून खामगावच्या विकासात भर घालणारा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे नागरिकांच्या वाहन नोंदणीसाठी बुलढाणा वारीला पूर्णविराम लागणार आहे. तर जिल्हा होण्याच्या दृष्टीने देखील आश्वासक पाऊल मानल्या जात आहे.
---आमदार कुटे यांचेकडूनही फुंडकरांचे अभिनंदन---
खामगाव येथे आरटीओ कार्यालयाला शासनाने मान्यता दिल्यामुळे केवळ खामगावच नव्हे तर घाटाखालील शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा या तालुक्यातील नागरीकांना सुद्धा वाहन नोंदणीसाठी सोयीचे होणार आहे. ही मोठी उपलब्धी बघता जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी खामगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO Office) मंजूर करून आणल्याबद्दल आमदार आकाश फुंडकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तशी फेसबुक पोस्ट आमदार कुटे यांनी केली आहे.
-----------------------
