केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय जळगाव (जा.) च्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये मारली बाजी...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय, जळगाव जामोद येथे दिनांक 3 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय विविध मैदानी स्पर्धांमध्ये केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर जळगाव (जा.)येथील विद्यार्थी रेले सांघिक स्पर्धेमध्ये अनिकेत ताडे, अभिषेक कवळकार, अभिषेक पाटील, ईश्वर गोतमारे, तिर्थक पवार, यांची प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरासाठी निवड तसेच 14 वर्ष वयोगटात 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत यश कचवे हा द्वितीय ,तर 17 वर्ष वयोगटात 1500 मी. मध्ये कन्हैया गोतमारे, सार्थक राठी याने द्वितीय, 800 मी मध्ये अभिषेक कवळकार याने द्वितीय, 1900 मी. स्पर्धेत सय्यद अब्दुल याने प्रथम ,तसेच 3 कि.मी. चालण्याच्या स्पर्धेमध्ये 17 वर्ष वयोगटात आशुतोष दलाल द्वितीय, तर 5 कि.मी चालण्याच्या स्पर्धेत अभिषेक कवळकार याने प्रथम तर अनिकेत ताडे याने द्वितीय त्याचप्रमाणे 19 वर्ष वयोगटात प्रसाद कचवे याने प्रथम तर अरहम खान याने द्वितीय क्रमांक तसेच 19 वर्षे वयोगटात 3 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत सय्यद सोहेल याने प्रथम क्रमांक पटकावला, तर 400 मी. हर्डल मध्ये 17 वर्ष वयोगटात गणेश केला याने प्रथम क्रमांक पटकावत, वरील सर्व विद्यार्थी जिल्हास्तरासाठी पात्र ठरले आहेत... यासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक योगेश घुटे सर, सहाय्यक शिक्षक नितीन बेंदरकार, साकेत गिरिजापूरे सर यांनी परिश्रम घेतले...त्याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष मा. श्री डॉ.किशोरजी केला, शाळेच्या मुख्यसंयोजिका डॉ. सौ. स्वातीताई केला शाळेचे मुख्याध्यापक विनायकजी उमाळे सर , प्राचार्य विनोद ईश्वरे सर यांनी पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या...
.jpg)