बुलढाणा शहरात जयश्रीताई शेळके यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद...23 तारखेला विजयाची माळ जयश्रीताई शेळके यांच्या गळ्यात पडणार...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
बुलढाणा विधानसभा मतदारसंघ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री सुनिल शेळके यांच्या प्रचारार्थ आज बुलडाणा शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बुलडाणा शहरातील नागरिकांसोबत हितगुज साधले. नागरिकांनी उस्फुर्त पाठींबा दिला. या पदयात्रेच्या निमित्ताने आपण देत असलेला प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके, जिल्हा संघटक डी. एस. लहाने, काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ताभाऊ काकस, मालतीताई शेळके यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व सन्माननीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते !