आ.डॉ.संजय कुटेंच्या भगिरथ प्रयत्नातून...संतनगरीचा विकासात्मक कायापालट झाला- शरदसेठ अग्रवाल
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
शेगाव संतनगरी असल्याने शहरात दररोज हजारो भाविकांची रेलचेल असते. परंतु या ठिकाणी आल्यावर शहराचे विद्रूपीकरण दिसू नये म्हणून मुख्य चौकांचे उत्कृष्ट असे सौंदर्याकरण आ.डॉ. संजय कुटे यांच्या भगीरथ प्रयत्नातून झाले. त्यामुळे शहराचे सुंदरता आणखीच वाढली असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा भाजपनेते शरदसेठ अग्रवाल यांनी केले आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघासह शेगावच्या विकासासाठी आमदार कुटे यांनी खेचुन आणला आहे. कुठल्याही प्रकारचे साम्राज्य उभे न करता केवळ सेवेकरी म्हणून संजय कुटे यांनी काम केले. २० वर्षापूर्वीचे शहर व आताचे शहर यामध्ये खूप मोठी तफावत आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात रस्त्यांचे जाळे विणल्या गेले. भू- गटार योजनेतून सांडपाण्याची व्यवस्था करण्यात आली. हर घर नल.. और हर नल को जल.. याप्रमाणे शहरातील प्रत्येक घरी शुध्द गोड्या पाण्याची व्यवस्था 140 गाव पाणी पुरवठा योजनेतून झाली. शहरातील विविध भागात असलेल्या ओपन स्पेसचे सौंदर्याकरण करण्यात आले. त्या ओपन स्पेस मध्ये बालगोपालांना खेळण्यासाठी क्रीडा साहित्य उपलब्ध करून वॉकिंग करिता पेव्हर लावण्यात आले. त्याचा उपयोग शहरातील महिला वृध्द व नागरिक मोठ्या संख्येने घेत आहेत. ओपनस्पेसमुळे संतनगरीच्या वैभवात भर पडली. पूर्वी घरातील सांडपाणी रस्त्यावर यायचे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत होते. ही समस्या जाणून लक्षात घेता आ. कुटे यांनी भूगटावर योजना प्रस्तावित केली. त्याला मंत्रालय स्तरावरून मंजुरात मिळवून घेतली. योजना मंजूर झाल्यावर पहिल्या टप्यातील काम देखील पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे सांडपाण्याची मोठी समस्या दूर झाली आहे.अकोट रोडवरील रेल्वे गेट गेट बंद वारंवार बंद होत असल्याने वाहनांच्या रांगा लागत होत्या. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा व्हायचा त्यामुळे या रेल्वे गेटवर रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने उड्डाणपूल साकारला व तासन् तास होणारा वाहतुकीचा खोळंबा संपविला. रेल्वे गेटच्या पलीकडे नागरिकांना उड्डाणपूल चढून फेऱ्याने यावे लागत असल्याने रेल्वे गेट जवळच भुयारी मार्ग प्रस्तावित केला व त्या भुयारी मार्गाचे भूमिपूजन देखील झाले असल्याने लवकरच या ठिकाणी भुयारी मार्गाचे काम सुरू होऊन पूर्णत्वास जाणार आहे. त्यामुळे रेल्वे गेट पलीकडील रहिवाशांना उड्डाणपूल चढून येण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे हा खूप मोठा दिलासा आमदार कुटे यांनी दिला आहे.
