अकोट ते पोपटखेड रोडवर लक्झरी व टिप्परची समोरासमोर धडक,दोन जण गंभीर जखमी...
सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
अकोट ते पोपटखेड रोडवर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहे त्यामुळे वाहन रोडवर चालवणे कठीण झाले आहे. या रोडवर आज दि.९ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास टिप्पर व खाजगी लक्झरी बसची समोरासमोर धडक झाली त्यामध्ये दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.तर गौण खनिज ने भरलेले टिप्पर हे पलटी झाले आहे.तर लक्झरी बसचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हा अपघात एवढा मोठा भयंकर होता की यात अनेक जण दगावण्याची भिती होती.पंरतु दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी सुखरुप आहेत.सदर खाजगी लक्झरी बस धारणी वरुन अकोटकडे येत होती.तर भरधाव वेगाने येत असलेले गौण खनिजचे टिप्पर अकोट वरून पोपटखेड कडे जात होते.या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सदर अपघात झाला असल्याचे समजते.पोपटखेड ते अकोट रोडवर दररोज गौण खनिजचे टीप्पर दिवसभर मोठ्या प्रमाणात चालतात सदर टिप्पर हे भरधाव वेगाने असतात.त्यामुळे या रोडवर बरेच वेळा अपघाताचे प्रमाण सुरूच आहे.करिता संबंधित विभागाने दखल घेऊन या रोडवरील खड्डे ताबडतोब बुजविण्याची मागणी होत आहे.सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी धाव घेऊन जखमींना ताबडतोब अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले.
