खासदार छत्रपती संभाजी राजेंनी रात्र काढली आदिवासी पाड्यावर... आदिवासी नृत्याचा घेतला आनंद...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
जळगाव जामोद येथील प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपल्यानंतर रात्रीचा मुक्काम उमापूर येथील डावर वस्ती आदिवासी पाड्यावर केला. महाराष्ट्र - मध्यप्रदेशच्या सीमेवर डोंगरी भागातील जंगलात हा पाडा वसलेला आहे. इथला मुक्काम माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. आदिवासी बांधवांसोबत त्यांच्या पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या भोजनाचा आस्वाद घेतला. पाली आदिवासी नृत्याचा आनंद घेतला.वडिलधारी मंडळी व तरुणांच्या सोबत केलेल्या अनौपचारिक गप्पागोष्टींमधून आदिवासी जीवनशैली, विचारप्रणाली समजून घेता आली. त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. निसर्गविषयी अधिकची माहिती मिळाली. निसर्ग आणि मनुष्य एकरूप होऊन आनंदाने आणि समाधानाने राहू शकतो, याची जाणीव अधिक गडद झाली.आदिवासी बांधवांनी केलेलं उत्साही स्वागत, आपुलकिने केलेलं आदरातिथ्य आणि त्यांच्या निर्मळ स्वभावाने मी अक्षरशः भारावून गेलो. असे उद्गार यावेळी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी काढले..
