आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या संकल्पनेतून मतदारसंघातील रस्ते होत आहेत गुळगुळीत.. दर्जेदार रस्त्यांमुळे दळणवळण झाले सुकर..

आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या संकल्पनेतून मतदारसंघातील रस्ते होत आहेत गुळगुळीत.. दर्जेदार रस्त्यांमुळे दळणवळण झाले सुकर..

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

आमदार डॉ.संजय कुटे यांनी जळगाव जामोद मतदार संघात रस्ते विकासाचे जाळे विणले,रस्ते चकाचक होत असून दर्जेदार रस्त्यांमुळे दळणवळण सुकर झाले आहे.बुलढाणा जिल्ह्यातील, सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ असून या मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी गेली दोन दशके अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. संजय कुटे अर्थात आपले सर्वांचे लाडके संजूभाऊ.रस्ते हे शहरांच्या रक्त वाहिन्या आहेत हे ओळखून संजयभाऊंनी संपूर्ण मतदारसंघात रस्ते विकासाचा धडाकेबाज कार्यक्रम हाती घेतला.जळगाव जा मतदार संघातील खेड्यापाड्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेचे चित्र विधानसभेत मांडले.जनतेची या त्रासातून मुक्ती करण्यासाठी शासन दरबारी या भागाचा आमदार म्हणून मागणी केली. त्यावर महायुती सरकारचे दोन वर्षाचे कार्यकाळात मतदारसंघात रस्ते, पूल आणि शासकीय इमारत बांधकाम यासाठी तब्बल २४०० कोटी रुपयांची विविध विकासकामे मंजूर असून ती प्रगतीपथावर आहेत.यात शेगांव ते मध्यप्रदेश सीमेपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे सुमारे ५२ किलोमीटरचे बांधकाम करणे, राज्य महामार्ग इतर जिल्हा महामार्ग, ग्रामीण रस्ते व पूल निर्मिती करणे, करणवाडी ते पिंपळगाव व जळगाव जामोद ते सोनाळा ते जिल्हा सीमेपर्यंत ४० किलोमीटरच्या रस्त्याचे बांधकाम करणे, तरोडा - डी - पाडसुळ ते आडसुळ आणि मानसगाव-गोळेगाव-पाडसुळ- मानेगाव ते चारमोरी या ३४ किलोमीटर रस्त्यांचे बांधकाम, संपूर्ण मतदारसंघात शासकीय इमारतींचे बांधकाम आदि योजनांचा समावेश असून खांडवी- पातुर्डा- उकळी ते जिल्हा सीमेपर्यंत रस्ता बांधकाम, वृक्ष लागवड व सौंदर्याकरणाचे काम पूर्ण झाले असून पूर्णा नदीवरील खिरोडा- भास्तन-मानेगाव या तीन मोठ्या पूलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. जळगाव जामोद शहरातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बस स्थानक ते शाळा व कॉलेजेस पर्यंत १० कोटी रुपयांच्या पादचारी पूलाची निर्मिती प्रगतीपथावर आहे. दहा कोटी रुपयांच्या वारी हनुमान पूलामुळे भक्तांना वाण नदीवरून थेट हनुमान मंदिरात जाता येईल. रस्त्यांच्या आणि पूलांच्या निर्मितीमुळे दळण वळण सोपे होऊन नागरिकांचा अमूल्य वेळ आणि इंधन वाचतो,त्यामुळेच डाॅ संजय कुटे यांच्या बाजुने मतदार संघातील नागरिकामध्ये सकारात्मक कौल दिसत आहे.जळगाव जा विधानसभा मतदार संघात मागील दोन दशकापासून रस्त्यांची कामे गतीने व दर्जेदार पद्धतीने होत असल्यामुळे रस्त्यांमुळे दळणवळणाच्या साधनांत वाढ झाली आहे. ग्रामीण, दुर्गम भाग तालुक्यांना जोडले गेल्याने सर्वसामान्यांना नोकरी-व्यवसाय करणे सुलभ झाले आहे. बाजारपेठा जवळ आल्याने प्रवासाचा वेळ कमी झाला आहे. आर्थिक वृद्धीमुळे जीवनमान उंचावले आहे. चांगल्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमुळे मालमत्तेचे मूल्यही वाढले आहे. याचे सर्व श्रेय जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डाॅ संजय कुटे यांनाच जाते असे म्हटले तर ते अतिशोक्ती ठरणार नाही .हा विधानसभा मतदार संघ जळगाव जा,संग्रामपूर  व शेगाव या तिन तालुक्यातील लोकसंख्या एकत्र करून तयार केलेला आहे.तिनही तालुक्यातील प्रत्येक गाव-खेड्यांना  जोडण्यासाठी व तेथील दळणवळण वाढवण्यासाठी तसेच या गावांचा रस्त्यांचा आणि इतर विकास करण्यासाठी माजीमंत्री डॉ.संजय कुटे यांनी पाठपुरावा करून मतदार संघातील रस्त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणून खेड्यांचा  व तालुक्याचा विकास केला. यामुळे जळगाव जामोद मतदार संघातील लहान मोठी गावे एकमेकांना व शहरांशी जोडली गेली. याच विकासकामामुळे आमदार डॉ.संजय कुटे यांचे सर्वस्तरातून कौतुक व आभार व्यक्त करत आहेत.

●  शेतरस्त्यांमुळे शेतकऱ्यांची सोय....

मतदार संघातील शेतरस्ते तयार करून त्यावर डांबरीकरणही करण्यात आले आहे.शेतरस्त्यांचे डांबरीकरण झाल्याने शेतीचे मुल्य वाढले.पावसाळ्यात शेतमाल ने -आण करण्यास सोयीचे झाले झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.येत्या 20 नोव्हेंबर रोजी  विधानसभा निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ संजय कुटे यांच्या कमळ निशाणी समोरील बटन दाबून विजयी करण्याचा शेतकरी वर्गाने निर्धार  केला आहे...

Previous Post Next Post