डॉ. स्वातीताई वाकेकर यांना निवडणूक प्रचार रॅलीमध्ये खूप मोठ्या संख्येने जनतेचा आशीर्वाद...
मंगल काकडे/पिंपळगांव काळे प्रतिनिधी-
जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव सर्कल मधील अकोला खुर्द येथे सर्वप्रथम डॉ.स्वातीताई वाकेकर यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण व अभिवादन करून निवडणूक प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ.सौ.स्वातीताई संदिप वाकेकर यांच्या निवडणूक प्रचार रॅलीमध्ये जनसमुदायाचा मतरुपी आशीर्वाद मोठ्या संख्येने डॉ .स्वातीताई वाकेकर यांच्या सोबत आहे.आता बदल व्हावा, परिवर्तन होणार स्वातीताई येणार असे उद्गार जळगाव जामोद विधानसभा क्षेत्रातमध्ये नागरिक चर्चा करीत आहे. व डॉ.स्वातीताई वाकेकर यांना विधानसभेवर एक वेळ संधी देऊन बदल व्हावा अशी पण चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.सर्वप्रथम आसलगांव सर्कल मधील आकोला खुर्द येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून निवडणूक प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली.यामध्ये अकोला खुर्द,टाकळी पारस्कर,टाकळी खासा,गाडेगाव खुर्द,सातळी,सुकळी,गाडेगाव बु, आदी गावांमध्ये महीला, शेतकरी, गोरगरीब जनतेचा यावेळी उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.याप्रसंगी महाविकास आघाडीचे व मित्र पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...
