आदिवासी भागातही संजूभाऊंनाच पसंती नेपानगरच्या आमदार मंजू रविंद्र दादू यांनी केला प्रचार दौरा..
जळगाव जामोद प्रतिनिधी-
जळगाव जामोद मतदारसंघातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या आदिवासी भागातही महायुतीचे उमेदवार आ डॉ.संजय कुटे यांनाच पसंत मिळत असल्याचे दिसत आहे.14 नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेश मधील नेपानगरच्या आमदार मंजू रविंद्र दादू यांनी डॉ.संजय कुटे यांच्या निवडणूक प्रचारार्थ जनसंवाद दौरा केला.दरम्यान निमखेडी, उमापूर रायपूर चालठाणा निहालवाडी सोनबर्डी शिवनी वसाडी या भागात गावभेटी करून घराघरात तीन मतदारांची संपर्क केला आदिवासी बांधवांना बंधू-भगिनींना आमदार डॉक्टर संजय कुटे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. आमचे आमदार संजूभाऊच आहेत असे आदिवासी बांधवानी सांगून संजुभाऊला निवडून आणण्याचा निर्धार केला. या जनसंवाद दौरांतर्गत स्नेपानगर मध्य प्रदेशातील आमदार मंजू दादू, सौ अपर्णा कुटे यांनी येथील नागरिकांशी संवाद साधला यावेळी महायुती व मित्रपक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जनसंवाद दौऱ्याला उपस्थित होते..
