जयश्रीताईंमुळे विरोधकाची हवा टाईट - नरेंद्र खेडेकर..महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्धाटन...


 
जयश्रीताईंमुळे विरोधकाची हवा टाईट - नरेंद्र खेडेकर..महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्धाटन...

अनिल भगत/बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी..

उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जयश्रीताई शेळके यांचे नाव जाहीर होताच विरोधी पक्षाच्या आमदाराची हवा टाईट झाली असून आता वनसाईड फाईट होणार आहे, असे प्रतिपादन शिवसेना संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी केले.महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या जिजामाता व्यापारी क्रीडा संकुलमधील प्रचार कार्यालयाचे आज उदघाटन झाले. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना खेडेकर म्हणाले, खऱ्या अर्थाने ही लढाई प्रतिष्ठेची आहे.महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यानी बुलडाणा विधानसभेच्या बूथवर परिश्रम घ्यावे. जास्तीत जास्त मते महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांना मिळवून द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत म्हणाले की, ताई तुमचे भाऊ हे खूप मेहनतीने काम करीत आहेत. यावेळी आम्ही तुम्हाला आमदार म्हणून विधानसभेत पाठविणार आहे. तुमच्या हातून बुलढाण्याचा   विकास होतांना आम्हाला पाहायचा आहे. धीरज लिंगाडे यांनी सांगितले की, बुलडाणा विधानसभा मतदारसंघात दहशतीचे वातावरण आहे. कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही. मात्र या प्रकाराला न जुमानता जयश्रीताई शेळके यांच्या पाठीशी उभे राहून आपणास विजयाचा झेंडा फडकवायचा आहे.जयश्रीताई शेळके म्हणाल्या, ही लढाई कित्येक दिवसांपासून सुरू आहे. खऱ्या अर्थाने उमेदवारी अर्ज भरल्यापासून लढाईचे रणशिंग फुंकले आहे. येत्या ८ नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जयश्रीताई शेळके यांनी केले.  या सभेतून महविकास आघाडीचे विचार जनमानसात पोहचवून बुलडाणा विधानसभेत मशाल पेटवायची आहे, असेही त्या म्हणाल्या.

Previous Post Next Post