●नळ योजनेमुळे गावा गावात पिण्यासाठी शुध्द पाणी पुरवठा●किडनीच्या आजारावर लागला प्रतिबंध●आ. डॉ.संजय कुटे यांच्या भगीरथ प्रयत्नांचे फलित,नागरिकांनी मानले आभार...
राजेश बाठे/संपादक आर सी २४ न्युज...
जळगाव जा विधानसभा मतदार संघात आ डाॅ संजय कुटे यांच्या भगीरथ प्रयत्नामुळे 140 गाव पाणी पुरवठा योजनेसह उर्वरित गावांचाही विस्तारित योजनेत समावेश करण्यात आला आहे.खारपाणपट्टा असलेल्या मतदार संघातील गावा गावात नळयोजनेद्वारे शुध्द पाणी पुरवठा होत असून किडनीच्या आजारावर प्रतिबंध लागला आहे.त्यामुळे नागरिकांनी आ डाॅ संजय कुटे आभार मानत आहेत.खारपाणपट्ट्यातील गावांना भेडसावत असलेली किडनीच्या आजाराची भिती नाहिसी होत आहे.सन 2004 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून जनतेने एक नवख्या तरुणाला म्हणजेच आमदार संजय कुटे यांना संधी दिली व या संधीचे विकास कामातून त्यांनी सोने केले. एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात अस्तित्व शोधत असलेला जळगाव जामोद मतदार संघ सद्यस्थितीत महाराष्ट्रभर गाजतोय.पायाभूत सुविधा असो ,रस्ते असो वा सिंचन ,पर्यटन,या सर्व बाबतीत विकासा पासून कोसो दूर असलेला हा मतदार संघ होता.या मतदार संघाला विकासाच्या शिखरावर नेण्याचे काम आमदार डाॅ संजय कुटे यांनी केल्याचे नागरिक बोलत आहेत. मागे वळून पाहाल्यास शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे किडनीच्या आजारापासून अनेक जण गतप्राण झाले. या मतदार संघात हजारो लोक किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. ही बाब पेशाने डॉक्टर असलेल्या संजय कुटे यांनी ओळखली व भगीरथ प्रयत्न करून मतदार संघामध्ये 140 गाव पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे राबवली. माता भगिनींची पाण्यासाठी होत असलेली वणवण पायपीट थांबली व मतदार संघात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय झाली.ही मतदार संघात मोठी उपलब्धी समजल्या जाते.सोबतच सिंचनातून समृद्धीकडे ही खूणगाठ मनाशी बाळगून आ डाॅ संजय कुटे यांनी मतदारसंघात अनेक सिंचन प्रकल्प आणले. जीगाव, अरकचेरी, आलेवडी ,चोंडी प्रकल्प.चोंडी प्रकल्पाचे लोकार्पण होऊन आदिवासी भागात सिंचनाची सोय झाली. ●जिगाव प्रकल्पाला हजारो कोटी चा निधी आणून पाहिल्या टप्प्यातील अंशतः पाणी साठवण्याचे नियोजन केले.येत्या वर्षात हे सर्व सिंचन प्रकल्प पर्णत्वास जाण्याचे मार्गावर आहेत.शेतकऱ्याला शाश्वत सिंचनाची सोय झाल्यास त्याला सावकारा कडे हात पसरावे लागणार नाही.कोरडवाहू शेती बागायती झाल्यास शेतकरी समृध्द झाल्या शिवाय राहणार नाही.पाणी बारमाही उपलब्ध असल्यास न परवडणारी शेती नफ्यात झाल्यास राहणार नाही.या साठी या भागाचा आमदार म्हणून शर्थीचे प्रयत्न केले.भविष्यात मतदार संघातील सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटीबध्द असल्याचे डाॅ संजय कुटे यांनी RC 24 न्युज चे मुख्य संपादक यांचेशी मुलाखतीदरम्यान बोलतांना सांगितले.● मतदार संघात रस्ते व सिंचनाची सोय झाल्यामुळे येणाऱ्या काळात उद्योगधंदे ,साखर कारखाने MIDC निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही आमदार डाॅ संजय कुटे यांनी म्हटले.
