जळगाव जा,शेगाव मध्ये प्रचार रॅलीतील उत्स्फूर्त प्रतिसाद..डाॅ संजय कुटे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब!सर्व जाती धर्म, पंथा साठी समृध्द मतदार संघ हेच पुढचे ध्येय-डाॅ संजय कुटे...


 
जळगाव जा,शेगाव मध्ये प्रचार रॅलीतील उत्स्फूर्त प्रतिसाद..डाॅ संजय कुटे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब!सर्व जाती धर्म, पंथा साठी समृध्द मतदार संघ हेच पुढचे ध्येय-डाॅ संजय कुटे...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-

मागील 20 वर्षात मतदार संघात रस्ते,पूल,पाणी,सिंचन,विज यासह पायाभूत सुविधांनी परिपूर्ण केला,आता मोठे उद्योगधंदे उभारून औद्योगिक विकास करत सर्व जाती,धर्म, पंथातील लोकांसाठी मतदार संघ समृध्द करणे हेच माझे ध्येय आहे,यासाठी पुढील पाच वर्ष महत्वाची असून महायुतीला विजयी करा,अशी विनंती महायुतीचे उमेदवार आ डॉ.संजय कुटे यांनी जळगाव जामोद येथे केले.भाजपा, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आठवले गट लहुजी शक्ती सेना रयत क्रांती संघटना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार डॉ संजय कुटे यांच्या प्रचारार्थ जळगाव जामोद मध्ये भव्य प्रचार रॅली निघाली स्थानिक दुर्गा चौकातून प्रचार रॅलीला प्रारंभ होऊन शहरातील मुख्य रस्त्याने ही रॅली काढण्यात आली या रॅलीचा समारोप शहरातील विजय चौकात झाला.दिलेला शब्द पाळणे हा माझा स्वभाव असून ज्या ज्या टर्ममध्ये जे जे शब्द दिले ते ते पूर्ण केले यापुढील पाच वर्षे महत्त्वाची असून सिंचन प्रकल्प पूर्ण करून मतदारसंघात साखर कारखाना, संत्रा प्रकल्प, मका प्रक्रियावर आधारित इथेनॉल प्रकल्प  यासारखे मोठे मोठे उद्योग उभारून औद्योगिक क्रांती घडवायची आहे या औद्योगिक औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून युवा पिढीला रोजगाराची संधी मिळेल त्यामुळे युवा पिढीसाठी विशेष करून पुढील पाच वर्ष खूपच महत्त्वाची असल्याचे डॉ संजय कुटे यांनी म्हटले आहे.सन 2004 पूर्वीचा मतदारसंघ हा अतिशय भकास होता 2004 नंतर सर्वाना सोबत विविध विकास कामांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांनी परिपूर्ण मतदारसंघ बनविला. आता मतदारसंघ चांगल्या मूडवर आलेला असून पुढील पाच वर्ष हे युवकांची काळजी घेणारा मतदारसंघ राहणार आहे. मागील वीस वर्षात कोणताही जातीभेद,जात समूह, धर्म यांमध्ये भेदभाव  केला नाही. प्रत्येक माणूस हा आपला आहे ही भावना आपण ठेवली. सकारात्मक राजकारण करत सर्व धर्मीय,सर्व,जातीय,सर्व पंथीय लोकांसाठी विकास साधल्याचेही डाॅ संजय कुटे यांनी म्हटले आहे.रॅलीतील मतदारांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे डॉ संजय कुटे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्याचे मतदारांनी सांगितले.

● जळगाव जामोद रॅली मधील प्रचार रॅलीत महायुतीचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच .हजारो मतदार सहभागी झाले होते.

● रॅलीत लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त पाठींबा....

जळगाव जा,संग्रामपूर नंतर शेगाव शहरात प्रचार रॅली निघाली.तिनही ठिकाणी रॅलीत लाडक्या बहिणी,मातृशक्ती हजारोंच्या संख्येने  कमळ चिन्ह असलेला झेंडा खांद्यावर घेऊन सहभागी झाले होते.

●मतदार संघात रॅलीचे ठिकाणी उत्स्फूर्त स्वागत...

जळगाव जामोद मतदार संघातील जळगाव जामोद नंतर संग्रामपूर तालुक्यात ठीक ठिकाणी डॉक्टर संजय कुटे यांच्या समारोपीय रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत झाले मतदारसंघातील खिरोडा येथे रस्त्याच्या दुतर्फा जेसीपी द्वारे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या सर रॅलीवर पुष्पवृष्टी करून ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला  "विकासासाठी फक्त, संजूभाऊ, संजूभाऊ" अशा घोषणा देत आम्ही महायुती सोबत असल्याचा भरोसा ग्रामस्थांनी डॉक्टर संजय कुटे यांना दिला.

Previous Post Next Post