आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रचारार्थ आज भव्य रॅली व सभेचे आयोजन...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
आज दिनांक 18/11/2024 रोजी महायुतीचे उमेदवार मा.डॉ.संजयभाऊ कुटे यांच्या जळगाव जामोद येथून सकाळी 09 वाजता भव्य रॅलीचे आयोजन केले आहे सदर रॅली ही सकाळी 9:30 ते 1 जळगाव जामोद मध्ये राहील.
1 वाजता जळगाव वरून चांगेफळ मार्गे शेगावला फोर व्हीलर गाड्यांनी निघणार आहे मध्ये चांगेफळ येथे भोजनाची व्यवस्था राहील ( भोजनाचे पॅकेट हे गाडीमध्येच मिळतील ) दोन वाजेपर्यंत शेगाव मध्ये पोचून ठीक 2 वाजता शेगाव येथून रॅली चालू होईल जळगाव जामोद येथे पार्किंगची व्यवस्था ( नवीन कोर्टाच्या समोरील ग्राउंड मध्ये केली आहे, व काही वाहने बायपास वरील हॉटेल मुंबई दरबार च्या बाजूच्या ग्राउंड मध्ये लावले तर चालतील
तरी सर्व सन्माननीय महायुतीचे प्रदेश,जिल्हा,तालुका व शहर पदाधिकारी तसेच प्रत्येक सर्कल मधील पदाधिकारी शक्ती केंद्रप्रमुख बूथ प्रमुख कार्यकर्ते महिला पदाधिकारी तसेच मतदार बंधू आणि भगिनी यांनी रॅलीसाठी उपस्थित राहावे ही विनंती आहे प्रत्येक सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी व सर्कल प्रमुख यांनी आप आपल्या सर्कल मध्ये निरोप व्यवस्था करावी..
--टीप--
सर्व कार्यकर्ते बूथ प्रमुख व सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी आपापल्या बूथ वरून जास्तीत जास्त संख्येने वाहने सदर रॅलीला सकाळी 09 वाजेच्या आत पोहोचावे ही विनंती
ठिकाण:- भाजपा कार्यालय दुर्गा चौक जळगाव जामोद
जळगाव मधून पायी रॅली निघणार आहे त्यामुळे गाडी व्यवस्थित जागी पार्क करावी...
प्रकाश वाघ पाटील
भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष जळगाव जामोद
