सहकार विद्या मंदिर च्या शुभम जमरा ची एमबीबीएस साठी निवड..डॉक्टर किशोर केलांसह संचालक मंडळाकडून स्वागत...


 
सहकार विद्या मंदिर च्या शुभम जमरा ची एमबीबीएस साठी निवड..डॉक्टर किशोर केलांसह संचालक मंडळाकडून स्वागत...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

जळगाव जामोद येथील केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर मध्ये इयत्ता नर्सरी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या शुभम हिरासिंग जमरा या आदिवासी विद्यार्थ्यांची एमबीबीएस वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी निवड झाली आहे... संग्रामपूर तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी वसलेल्या आदिवासी बहूल वसाडी या छोट्याशा गावात राहुन प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याने शुभम जमरा याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.... त्या अनुषंगाने केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर व बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीचे उपाध्यक्ष तथा बुलढाणा अर्बनचे संचालक डॉक्टर किशोर केला यांनी शुभम जमरा  याचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले... सहकार विद्या मंदिर च्या माध्यमातून तळागाळातील आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत... त्यामुळेच संग्रामपूर सारख्या आदिवासी बहुल तालुक्यातील वसाडी या छोट्याशा गावातील विद्यार्थी आपला व सहकार विद्या मंदिर चा नावलौकिक कमवीत असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी डॉक्टर किशोर केला यांनी केले... शुभम समरा याच्या सत्कार समारंभ प्रसंगी डॉक्टर किशोर केला यांच्यासह संचालक विजय राठी, बुलढाणा अर्बन चे शाखा व्यवस्थापक योगेश जोशी, राजेश राठी, विशाल सेदानी, गजानन मालोकार यांच्यासह बुलढाणा अर्बन जळगाव जामोद शाखेचे पदाधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते..

Previous Post Next Post