आसलगाव सर्कल मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ सौ स्वातीताई वाकेकर यांच्या प्रचाराचा झंझावात...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
जळगाव जामोद मतदारसंघात निवडणूक प्रचाराला रंगत आली असून महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळात असुन आज दिनांक ७ नोव्हेंबर रोजी डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांचा आसलगांव सर्कल मध्ये प्रचाराची सुरुवात केली आहे.विधानसभेच्या उमेदवार डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांनी सुलज येथील जगदंबा देवी मंदिरात देवीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली.सुलज, पळशी सुपो,मोहीदेपुर,नाव खुर्द, इस्लामपूर, धानोरा, इत्यादी गावातील महिला शेतकरी, गोरगरीब जनतेचा उत्सुर्त प्रतिसाद यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ सौ स्वातीताई वाकेकर यांना मिळाला.यावेळी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.