निवाना जिल्हा परिषद शाळेत वीर बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
दिनांक 15 नोव्हेंबरला जि प शाळा निवाणा येथे तसेच ग्रामपंचायत कार्यालयात बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती साजरी करण्यात आली सर्व प्रथम आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोपान सोळंके यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले व आपले मनोगत व्यक्त करतांना सोपान सोळंके म्हणाले की बिरसा मुंडा हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील धगधगतं अग्नी कुंड आपल्या महान विचारांनी आदिवासींना संघटित करून उलगुलान करणारे भारत मातेचे वीर सुपुत्र होते.त्यांनी इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारून जल जमीन जंगल वाचवण्यासाठी प्रयत्न केला अशा महान क्रांतिकारकला विनम्र अभिवादन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य आशिष भाऊ सरदार सरपंच शोभाताई अवचार अनंता भाऊ मसुरकार होते तसेच शिवहरी सोळंके उमेश गाळकर आकाश सोळंके रामभाऊ टेकाडे जनार्दन सोळंके जानुसिंग सोळंके अजय पवार विजयसिंग सोळंके इत्यादी आदिवासी बांधव उपस्थित होते
