बावनबीर मध्ये आ डॉ.संजय कुटे यांनाच साथ!प्रचार रॅलीत घरोघरी झाले संजूभाऊंचे स्वागत.
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
बावनबीर येथे महायुतीच्या विजयासाठी भव्य प्रचार रॅली संपन्न झाली संपन्न झाली, यावेळी गावातील नागरिक, कार्यकर्ते आणि महिला भगिनींनी मोठ्या उत्साहाने प्रचार रॅलीमध्ये सहभागी घेऊन विकासाचा जयघोष केला.हे प्रेम प्रत्येकाच्या नशिबी येउच शकत नाही,बहिणींच्या प्रेमाला-विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही डाॅ संजय कुटे यांनी बावनबीर मधील प्रचार रॅली दरम्यान दिली.महायुती सरकारने राज्यातील सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवूनच आपला प्रत्येक निर्णय घेतलेला आहे. लाडकी बहिण, एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के तर ज्येष्ठांना पूर्ण सवलत, शेतकऱ्यांना मोफत वीज, नमो सन्मान निधीतून मिळत असलेली मदत यासारख्या कित्येक योजनांमधून आपण पाहत असून त्याचा लाभ देखील घेत आहात.त्यामुळे हे सरकार आपल्या सर्वांचे असून ते असेल तरच गरिबांचे कल्याण होणार आहे. त्यामुळे येत्या २० तारखेला भाजपा-महायुतीच्या कमळ या चिन्हा समोरील बटण दाबून आपले सरकार पुन्हा या राज्यात आणायचे आहे, असे आवाहन भाजपा महायुतीचे उमेदवार आ डॉ.संजय कुटे यांनी केले.
