●आ. डॉ.संजय कुटे यांचा कार्यकर्ता पडद्या मागचा कलाकार "निलेश शर्मा"●उत्कृष्ट संघटन व संवाद कौशल्य,कार्यक्षमता,निष्ठावान म्हणून निलेश शर्मा यांची ओळख...


 
●आ. डॉ.संजय कुटे यांचा कार्यकर्ता  पडद्या मागचा कलाकार "निलेश शर्मा"●उत्कृष्ट संघटन व संवाद कौशल्य,कार्यक्षमता,निष्ठावान म्हणून निलेश शर्मा यांची ओळख...

राजेश बाठे/संपादक आर सी २४ न्युज...

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात पाचव्यांदा आमदार डॉ. संजयभाऊ कुटे यांनी निवडणूक लढवून जनता जनार्दनांच्या आशीर्वादाने विजय मिळवला या विजयामध्ये लाडक्या बहिणीसह सर्वच क्षेत्रातील लोकाचा सहभाग आहे. या विजयात माजीनगरसेवक  निलेश शर्मा यांचाही खारीचा वाटा आहे ते आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू म्हणून त्यांची मतदारसंघात ओळख गेल्या २५ वर्षा पासून आहे. आमदार साहेबांचा असलेला विश्वास सार्थ ठरवत लोकांची कामे करणे.आ. डॉ.संजय कुटे यांची त्यांचेवरील विश्वासार्हता कायम ठेवत आमदार साहेबांच्या  मागेही जनतेची कामे करण्याची किमया यांच्यात दिसून येते.जळगाव जामोद मध्ये आ डॉ.संजयभाऊ कुटे यांच्या मार्गदर्शनात  युवकाचे मजबूत संघटन त्यांनी निर्माण केलेले आहे.  त्यामध्ये सर्व जाती धर्म पंथातील युवक जुळलेले आहेत हजारो  युवकांची फळी शर्मा यांच्या माध्यमातून आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रेरणेने समाजसेवेत कार्यरत आहे. युवकांना  रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या,उद्योग,व्यवसाय उभारणीसाठी आ डॉ.संजय कुटे यांच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देणे,यामुळे युवा वर्ग निष्ठेने यांचेसोबत जुळून आहे.या विजयामध्ये युवा वर्गाचाही मोठा वाटा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही सोबतच ऐन निवडणुकीच्या धामधुमीत प्रचाराच्या धामधुमीत आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या माघारी कामाचं सूक्ष्म नियोजन करून जळगाव जा शहरात प्रचाराची यशस्वी धुरा सांभाळली. निलेश शर्मा प्रत्यक्ष प्रचारात दिसून येत नाही, कुठे ही फोटो किंवा त्यांच नाव नसते परंतु मागे राहून मायक्रो मैनेजमेंट हा कार्यकर्ता करीत असल्याचे दिसते. आमदार साहेबांना प्रत्यक्ष भेटलेच पाहिजे असही नाही त्यांची भेट घेतली म्हणजे आमदार साहेबांना भेटलो अशी भावना अनेक कार्यकर्ते पदाधिकारी व  नागरिकांची त्यांच्याप्रती आहे.आमदार डाॅ संजय कुटे यांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून निलेश शर्मा यांची मतदार संघात ओळख आहे.  आमदारांच्या नेतृत्वाखाली काम करतांना त्यांच्या ध्येयांची पूर्ती करण्यासाठी ही व्यक्ती कार्यरत असते. स्थानिक समुदायातील लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आमदारांशी स्वतः संपर्क साधून सामान्य लोकांची गैरसोय होणार याची आवर्जून काळजी घेतात.आमदार आणि त्यांच्या पक्षाप्रती निष्ठा असने,आमदारांच्या ध्येयांची पूर्ती करण्यासाठी कार्यक्षमपणे काम करणे. स्थानिक समुदायातील लोकांशी प्रभावीपणे संवाद साधणे.स्थानिक समुदायाच्या गरजा आणि समस्या समजून घेणे आणि त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणे.आमदाराचा सच्चा कार्यकर्ता हा एक महत्वाचा भूमिका बजावत आमदार आणि स्थानिक समुदाय यांच्यातील सेतू म्हणून काम करणे, आमदाराचा सच्चा कार्यकर्ता ही एक पवित्र भूमिका निभावतांना समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करणे.लोकांची कामे करतांना ,अडी अडचणी सोडवतांना सर्व धर्म समभाव जपतं सामाजिक समरसताही  यांनी  निर्माण केली आश्या काही बाबी त्यांच्या आहेत.आमदार डॉ.संजयभाऊ कुटे यांचा निष्ठावान कार्यकर्ता या सोबतच कार्य तत्पर,संघटन व संवाद कौशल्य, निष्ठावान, नम्रता यासह विविध गुण अंगी असल्याने बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून निलेश शर्मा हे ओळखल्या जातात.

Previous Post Next Post