चिखलदर येथिल पेसा मोबिलायझर मानधन असुन मानधना पासुन वंचित...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
चिखलदरा व धारणी तालुक्यात२०१७ वर्षी शासनाच्या निर्णय नुसार ग्राम पंचायत नुसार महिला बचत गटा मार्फत पेसा मोबिलायझर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.परंतु धारणी व चिखलदरा तालुक्यातील काही पेसा मोबिलायझर त्यांच्या मानधना पासुन वचिंत राहत असल्याने त्यांची उपास मारीची वेळ येत असल्याचे समजले जात आहे. बोलल्या जात आहे की पेसा मोबिलायझर यांचा मानधन जानेवारी ते जुन महीण्याचा प्राप्त झाला असुन ते मानधन ग्राम पंचायत च्या ग्राम स्वराज्य बैंक आफ इंडिया या खात्यात जमा झाला आहे परंतु शासनाच्या आदेशानुसार ग्राम पंचायत अधिकारी हे महिला बचत गटाच्या नावाने चेक देत आहे.परंतु पेसा मोबिलाझर यांना त्यांचा मानधन घेण्यासाठी महिला बचत गटाचे महिला मानधन देण्यासाठी टाळाटाळ करण्याचे चित्र दिसुन येत आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे.तरीही धारणी व चिखलदरा येथिल पेसा मोबिलायझर यांचा मानधना बाबत विचार करुन यांचा मानधनाचा चेक ग्राम पंचायत अधिकारी यांच्या हस्ते सरळ पेसा मोबिलाझर यांच्या नावाने देण्यात यांवे अशी मागणी जोर धरत आहे.