केवलराम काळे यांचा पहिल्याच भेटीत धारनित जनता दरबार...


केवलराम काळे यांचा पहिल्याच भेटीत धारनित जनता दरबार...

राजु भास्करे / अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

नवनिर्वाचित आमदार केवलराम काळे यांचे निवडणुकीनंतर पहिल्यांदा धार नी येथे आगमन झाले .या आगमनानंतर पहिल्याच दिवशी त्यांचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच त्याचदिवशी या ठिकाणी जनता दरबार घेण्यात आला. या जनता दरबार मध्ये विजेची मुख्य समस्या असल्याने त्यावर प्रतेक सर्कल मधील नागरिकांनी आपल्या समस्याची मांडणी केली.आमदार केवलराम काळे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी चर्चा केली. ओव्हरलोडिंग होत असल्याने हि समस्या येत असल्याबाबत महावितरण चे उपविभागीय उपअभियंता यनगांटिवार यांनी सांगितले..हरीसाल सर्कल मधील चीत्री पोटीलावा, कोट,कोठा, कारा, जांबु,नांदुरी, चिखली सोसोखेडा, चौरकुंड, खोपमार, बोरी ता गावामध्ये अजिबात व्होल्टेज नसल्याने रब्बीची पेरणी होऊन पंधरा दिवस झाले अद्याप एक पाणीही झाले नाही त्यामूळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे.बियाणे आणि खते जमिनीत टाकल्या गेले.रब्बीचा हंगाम धोक्यात आले आहे.
त्यावरून ओलित न झाल्याने   जमिनीतील पेरलेले बियाणे कीटक    नष्ट करीत आहे म्हणून लवकरात लवकर विजेची समस्या निकाली काढण्याबाबत  सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना आमदारांनी दिल्या. त्यानंतर शेकडो लाडक्या बहिणींनी शाल श्रीफळ देऊन नवणीर्वाचित आमदार केवलराम काळे यांचा सत्कार केला. विवीध संघटनेच्या वतीने स्वागत व सत्कार अभिनंदन करण्यात आले.

Previous Post Next Post