प्रेमप्रकरणातुन प्रेमीयुगुलाची आत्महत्या...मुलीचे आई वडीलाविरोधात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल...


  
प्रेमप्रकरणातुन प्रेमीयुगुलाची आत्महत्या...मुलीचे आई वडीलाविरोधात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या काटेल येथे प्रेम प्रकरणातून अल्पवयीन  मुलीच्या कुटुंबाकडून आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे युवकाने विहिरीत उडी मारल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ही घटना  २९/नोव्हेंबर रोजी घडली असून मृतकाचे नाव श्रीकृष्ण  प्रभाकर पुंडे वय २३वर्षे  असे आहे. तर दुसऱ्या दिवशी ३० नोव्हेंबर  रोजी सकाळी १० वा.सुमारास अल्पवयीन १५ते १६ वर्षीय मुलीनेही राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघड झाली असून यामध्ये  पोलिसांनी मुलीचे वडीलास ताब्यात घेऊन तामगाव  पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत प्राप्त माहिती अशी की तालुक्यातील काटेल येथील एका अल्पवयीन मुलीचे गावातीलच २३ वर्षीय युवकासोबत प्रेम प्रकरण असल्याबाबत मुलीच्या कुटुंबाला समजल्यावर त्या युवकाचे मागे विळा घेवून मारण्याच्या उद्देशाने गेल्याने सदर युवक घाबरल्याने त्याने एका शेतात असलेल्या खोल विहिरीत उडी घेवून पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद मृतकाचे वडील प्रभाकर मधुकर पुंडे वय ४६ रा.काटेल यांच्या फिर्यादीनुसार तामगाव पोलिसांनी मृतक युवकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रमाणे गुन्हा  दाखल करून मुलीच्या वडीलास ताब्यात घेवून त्याचे विरुद्ध  तामगाव पो.स्टे.ला अप क्र.३६७/२०२४ कलम १०८, ३५१(२) ३५१(३) ,३(५)  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर घटनेच्या दुसऱ्या दिवशी आज दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. चे  सुमारास त्या अल्पवयीन मुलींनेही घरातच गळफास घेवून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.ह्याबाबत मुलीचे आजोबांनी  फिर्याद दिल्यावरुन मर्ग दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या आदेशाने डे आॕफीसर स.फौ.अशोक वावगे यांचे रिमार्कवरुन सदरचा गुन्हा दाखल करुन पोलीस उपनिरीक्षक विलास बोपटे यांचेकडे तपास देण्यात आला आहे.ह्या  घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

Previous Post Next Post