महाविकास आघाडीच्या उमेदवार स्वातीताई वाकेकर उद्या फोडणार प्रचाराचे नारळ.. तीर्थक्षेत्र धानोरा महासिद्ध तेथून करणार सुरुवात...

 

महाविकास आघाडीच्या उमेदवार स्वातीताई वाकेकर उद्या फोडणार प्रचाराचे नारळ..
तीर्थक्षेत्र धानोरा महासिद्ध तेथून करणार सुरुवात...
जळगाव जामोद प्रतिनिधी:- 

जळगाव जामोद मतदारसंघात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार डॉक्टर स्वातीताई वाकेकर या उद्या ५ नोव्हेंबर पासून प्रचाराला सुरुवात करणार असून,तालुक्यातील तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले धानोरा महासिद्ध येथून सुरुवात प्रचाराला सुरुवात करणार आहे.महाविकास आघाडीतील सर्व नेते मंडळी प्रचारासाठी पुढे सरसावले असून उद्या हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांनी धानोरा महासिद्ध येथे हजर राहावे असे आवाहन महाविकास आघाडीचा उमेदवार डॉ.स्वातीताई  वाकेकर यांनी केले आहे.
    धानोरा महासिद्ध तेथून प्रचाराला सुरुवात करणार असून ,मतदार संघातील प्रत्येक गावाला भेट देणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे.

Previous Post Next Post