आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रचारार्थ चौभारा येथून प्रचार रँली..
जळगाव जामोद प्रतिनिधी-
विधानसभा निवडणूक सुरू झाली असेल उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले व दिनांक पाच नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद शहरातील चौभारा चौक येथील मारुतीचे दर्शन घेऊन भाजपचे उमेदवार आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रचाराची सुरुवात अपर्णाताई कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आली. जळगाव जामोद शहरातील चौभारा भागातील धनगर पुरा,तबिल पुरा, अयोध्या नगर, श्री संत रुपलाल नगर,ताटीपुरा,वायली वेस,काळा मारुती मंदिर, फुसे गल्ली, ओंकारेश्वर मंदिरापासून, धुर्डे गल्ली, कोथळकर गल्ली, येथून जाऊन परत चौभारा येथे रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी संपूर्ण शहरातील चौभरा परिसरातील भारतीय जनता पार्टीचे तसेच महायुतीचे समस्त पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
