बी. एस. पटेल महाविद्यालयामध्ये संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा...


 
बी. एस. पटेल महाविद्यालयामध्ये संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था, पळशी वैद्य द्वारा संचालित बापुमिया सिराजोद्दिन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथे युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार तसेच राष्ट्रीय सेवा योजना, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सलीमजी पटेल, सहसचिव श्री. रब्बानीजी देशमुख, संचालक प्रा. कयूम पटेल, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. एफ. टी. शेख व आय. क्यू. ए. सी. यांच्या मार्गदर्शनातून दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारा "संविधान दिवस"साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाची सुरुवात डॉ. शेख फराह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन  करून केली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी संविधानातील उद्देशिकेचे वाचन केले. संविधान निर्मितीची पार्श्वभूमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्यासाठी घेतलेल्या कष्टाची माहिती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. मनोहर जांभळे यांनी दिली. तसेच २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद जवानांविषयी डॉ. बाबाराव सांगळे यांनी माहिती दिली व शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदर कार्यक्रम हा राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता व सदर कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post Next Post